Download App

संभाजी ब्रिगेड 50 जागा स्वबळावर लढणार, राजेंद्र शिंगणेंविरोधात दिला पहिला उमेदवार…

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद नारायणराव भानुसे रिंगणात उतरवले.

  • Written By: Last Updated:

Sambhaji Brigade : विधानसभा निवडणुकीपूर्वी (Vidhansabha Election) संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेसोबतची युती तोडली. त्यानंतर संभाजी ब्रिगेडने विधानसभा निवडणुक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली होती. दरम्यान, आता संभाजी ब्रिगेड राज्यात 50 जागा लढवणार असून बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद नारायणराव भानुसे (Dr. Shivanand Narayanarao Bhanuse) यांना रिंगणात उतरवलं.

बूथ प्रमुख हा भाजपचा कणा, झपाटून कामाला लागा; आ. संभाजीराव पाटील निलंगेकरांचे आवाहन 

सिंदखेडराजामध्ये डॉ.शिवानंद नारायणराव भानुसे रिंगणात…
संभाजी ब्रिगेड आणि उद्धव ठाकरे गटाची अडीच वर्षांपूर्वी युती झाली होती. मात्र दिलेला शब्द न पाळला नाही, दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही, असा आरोप करत संभाजी ब्रिगेडने ठाकरे गटासोबतची युती तोडली. आता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद नारायणराव भानुसे हे शरद पवार गटाचे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मंगळवार (29 ऑक्टोबर) सकाळी 11 वा. ते संभाजी ब्रिगेड पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲड. मनोज आखरे, सरचिटणीस सौरभ खेडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

कसब्यात पुन्हा रासने तर खडकवासला आणि कॅन्टोन्मेंटमध्ये विद्यमानांना संधी…

शिवानंद भानुसे हे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील विझोरा येथील रहिवासी असून ते सध्या छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयात कार्यरत आहे. वक्ते, लेखक, कवी तसेच मराठा आरक्षणाचे अभ्यासक अशी त्यांची ओळख आहे. भानुसे हे गेल्या 25 वर्षांपासून संभाजी ब्रिगेडमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघात विविध पदांवर काम केले असून सध्या ते संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते म्हणून कार्यरत आहेत.

संभाजी ब्रिगेड स्वबळावर 50 जागा लढवणार
राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संभाजी ब्रिगेडला विश्वासात घेतले नाही. त्यामुळेच आम्ही त्यांच्याशी असलेली युती तोडली. आता संभाजी ब्रिगेड राज्यात ५० हून अधिक उमेदवार उभे करून स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी बुधवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.

संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर, गंगाधर बनबरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

follow us