Download App

वानखेडेंच्या राजकीय इनिंगला ब्रेक; शिवसेनेकडून निवडणूक लढवणार नाही; चर्चांना पूर्णविराम

15 वर्षांच्या कारकिर्दीत 17,000 किलो अंमली पदार्थ आणि 165 किलो सोने जप्त करण्याची कारवाई वानखेडे यांच्या कार्यकाळात झाली आहे.

  • Written By: Last Updated:

मुंबई : महाराष्ट्राचे चर्चित IRS अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhde) एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा चर्चा होत्या. एवढेच नव्हे तर, ते धारावीतून विधानसभेच्या रिंगणात उतरणार होते. मात्र, वानखेडे यांच्या राजकीय इनिंगला तुर्तास ब्रेक लागला असून, वानखेडे शिवसेनेतून लढणार नसल्याचे स्पष्टीकरण शिंदेंच्या शिवसेनेतील सूत्रांनी एएनआयला सांगितले आहे. (Eknath Shinde) तसेच असा कोणताही प्रस्ताव नसल्याचेही पक्षाकडून सांगितले जात आले आहे. त्यामुळे सकाळापासून सुरू असलेल्या चर्चांना तुर्तास तरी पूर्णविराम मिळाला आहे. (Shivsena On Sameer Wankhede)

लेट्सअप विश्लेषण : मविआ की महायुती?, राज्याच्या ‘रणसंग्रामात’ छोटे खेळाडू कुणाचा खेळ बिघडवणार?

कोण आहेत समीर वानखेडे?

44 वर्षीय समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस अधिकारी आहेत. 2021 पर्यंत त्यांनी मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) झोनल डायरेक्टर म्हणून काम केले आहे. एनसीबीमध्ये रुजू होण्यापूर्वी वानखेडे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि एअर इंटेलिजन्स युनिटमध्ये काम केले आहे. 15 वर्षांच्या कारकिर्दीत 17,000 किलो अंमली पदार्थ आणि 165 किलो सोने जप्त करण्याची कारवाई वानखेडे यांच्या कार्यकाळात झाली आहे. याशिवाय अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातही समीर वानखेडे चर्चेचा विषय बनले होते.

पवार कुठलेही संकेत देत नाहीत; राऊतांनी एका वाक्यात सर्व चर्चा ठरवल्या फोल!

तेव्हाच सुरू करता येणार राजकीय प्रवास

एकीकडे समीर वानखेडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र, असा कोणताही प्रस्ताव नसून, वानखेडे शिवसेनेकडून निवडणू लढवणार नसल्याचे स्पष्टीकरण शिवसेनेक़डून देण्यात आले आहे. आता जरी वानखेडे हे शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरत नसले तरी, आगामीकाळात त्यांनी राजकीय इनिंग सुरू करण्याचा विचार केल्यास सर्वात पहिले त्यांना आयआरएस पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. पदाचा राजीनामा दिल्यानंतर वानखेडे यांचा राजीनामा केंद्र सरकारच्या गृह विभागाला स्वीकारावा लागेल आणि त्यानंतरच वानखेडे त्यांचा नव्या राजकीय इनिंग प्रवास सुरू करू शकतील. मात्र, तुर्तास तरी सकाळपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्मविराम मिळाला आहे.

follow us