Download App

ईव्हीएमचं बटन दाबताना मतदाराला हार्ट अॅटक, मतदान केंद्रावर सोडले प्राण, साताऱ्यातील घटना

आहे. ईव्हीएमवर (EVM) बटण दाबताना हृदयविकाराच्या झटक्याने खंडाळा तालुक्यातील मोरवे गावातील मतदाराचा मृत्यू झाला.

  • Written By: Last Updated:

Vidhansabha Election : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) आज मतदार पार पडले. लोकशाहीचा हा उत्सव एकीकडे साजरा होत असताना, दुसरीकडे काही दुर्दैवी घटना घडल्या. साताऱ्यात मतदान करताना मतदाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ईव्हीएमवर (EVM) बटण दाबताना हृदयविकाराच्या झटक्याने खंडाळा तालुक्यातील मोरवे गावातील मतदाराचा मृत्यू झाला. त्यामुळं मोरवे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यात पुन्हा महायुती सरकार? भाजप सर्वात मोठा पक्ष; एक्झिट पोलचा अंदाज काय 

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील खंडाळ्यातील मोरवे गावात दुपारी मतदानाचा हक्क बजावत असताना एका मतदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शाम धायगुडे (वय 67) असे या मतदाराचे नाव आहे. वयाच्या 67 व्या वर्षी धायगुडे मतदान करण्यासाठी ईव्हीएम मशीनजवळ गेले असता अचानक चक्कर आल्याने ते जागेवरच कोसळले. त्यामुळं तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेमुळे मोरवेर्वे गावातील मतदान केंद्र परिसरात काही काळ कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली होती. धायगुडेंना मतदानाचा हक्क बजावतानाच त्यांचा मृत्यू झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडून सात पोलीस निलंबित; नेमकं कारण काय?

बीडमध्ये उमेदवाराचा मृत्यू…

बीड जिल्ह्यातही अशीच घटना घडली असून या ठिकाणी अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
बीड शहरामधील छत्रपती शाहू विद्यालयातील मतदान केंद्रावर ही घटना घडली. त्यांना सुरुवातीस चक्कर आली आणि ते खाली कोसळले मात्र नंतर रुग्णालयात नेले असता त्यांचे निधन झाले. बाळासाहेब शिंदे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, परळी वैजनाथ शहरातील सरस्वती विद्यालयातील केंद्राध्यक्ष जालिंदर जाधव यांना सकाळी दहाच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

follow us