शरद पवारांना मोठा धक्का! साताऱ्यातील ‘हा’ बडा नेता आजच करणार भाजपात प्रवेश

शरद पवारांना मोठा धक्का! साताऱ्यातील ‘हा’ बडा नेता आजच करणार भाजपात प्रवेश

Sharad Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीची वाताहत (Sharad Pawar) झाली आहे. आघाडीतील तिन्ही पक्षांना गळती लागली आहे. शरद पवारांच्या गटालाही धक्क्यांवर धक्के बसत आहेत. आता ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर आणखी (Local Body Elections) एक नेता पवारांची साथ सोडणार आहे. साताऱ्यातील पाटण (Satara News) तालुक्यातील बडे प्रस्थ सत्यजितसिंह पाटणकर आज भाजपात प्रवेश करणार आहेत.

भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पाटणकर आज पदाधिकाऱ्यांसह भाजपात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे, आजच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन आहे. आजच्याच दिवशी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर संघटना बांधणी सुरू असतानाच नेते मंडळी पक्ष सोडून जात आहेत त्यामुळे आगामी काळात पक्षाची वाटचाल अधिक कठीण होत आहे.

वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही; चंद्रहार पाटलांच्या प्रवेशावेळी शिंदेंचा ठाकरेंना टोला

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाटणमध्ये एक बैठक झाली होती. या बैठकीत सत्यजितसिंह पाटणकर यांनी भाजपात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर बाकीच्या घडामोडी घडल्या आणि आज त्यांचा भाजपातील प्रवेश निश्चित करण्यात आला. पाटणकर यांच्या भाजपप्रवेशाने साताऱ्यातील राजकीय गणितं बदलणार आहेत. या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय ताकद आणखी कमी होणार आहे.

विधानसभा निवडणुकीत काय घडलं?

सहा महिन्यांपूर्वी राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई, ठाकरे गटाचे हर्षद कदम आणि सत्यजितसिंह पाटणकर अपक्ष म्हणून रिंगणात होते. खरी लढत पाटणकर आणि देसाई यांच्यातच होती. ठाकरे गटाचा उमेदवार असला तरी येथे त्यांची फारशी ताकद नव्हती. या लढतीत देसाई विजयी झाले. त्यांना एकूण 125759 मते मिळाली तर पाटणकरांना 90935 मते मिळाली. ठाकरे गटाचे हर्षद कदम यांना 9626 मते मिळाली. या मतदारसंघात ठाकरेंचा उमेदवार नसता तरीसुद्धा देसाई यांचा विजय निश्चित होता. कारण दोन्ही उमेदवारांच्या मतांतील अंतर 34 हजारांपेक्षाही जास्त होते.

पाटणमध्ये अनेक दशके देसाई आणि पाटणकर घराण्यांचं वर्चस्व राहिलं आहे. मात्र 2014 पासून या मतदारसंघात शंभूराज देसाई सातत्याने विजयी होत आहेत. त्यांनी पाटणकरांचा राजकीय प्रभाव बऱ्यापैकी कमी केला आहे. याआधी 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे विक्रमसिंह पाटणकर यांनी देसाईंचा पराभव केला होता. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत शंभूराज देसाई यांनी पराभवाचा वचपा काढला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube