Download App

पक्ष फोडणारे दोन-तीन लोक, पराभव करा, शरद पवारांचा परळीत रोख कुणाकडे?

Sharad Pawar On Dhananjay Munde :  राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष फुटीनंतर पहिल्यादा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Election

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar On Dhananjay Munde :  राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष फुटीनंतर पहिल्यादा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Election 2024) कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्व पक्ष जोराने प्रचार करत आहे. यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचन्द्र पवार पक्षाचे (NCPSP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी परळी विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेत घेत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका करत पक्ष फुटीला तीन नेते जबाबदार असल्याचं सांगितलं. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

या सभेत आपल्या भाषणाची सुरुवात करताच शरद पवार यांनी पक्ष फुटीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी शरद पवार म्हणाले की, पक्ष म्हणून काही संकट आली. अनेक अडचणी आहे. राजकीय पक्ष उभा केला मात्र काही लोकांनी पक्ष फोडण्याचं काम केलं. त्यांच्यामध्ये तीन लोक प्रामुख्याने होते. राष्ट्रवादीमध्ये अंतर वाढवणारे, सहकाऱ्यांमध्ये गैर विश्वास वाढवणारे दोन- तीन लोक होते. त्या दोन तीन लोकांमध्ये कोण आहेत हे मी सांगण्याची आवश्यकता नाही असं शरद पवार म्हणाले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, ज्यांनी पक्ष सोडला, ज्यांनी पक्ष फोडला, ज्यांनी समाजामध्ये अंतर वाढवण्याची भूमिका घेतली, ज्यांनी बीड जिल्ह्याचा आदर्श उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, अशा व्यक्तीला उद्याच्या निवडणुकीत पराभूत करा आणि राजेसाहेबांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं देखील या सभेत बोलताना शरद पवार म्हणाले.

तर दुसरीकडे 2023 मध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 40 आमदारसोबत घेऊन शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारमध्ये एंट्री केली होती. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.

‘स्वतःच्या गावात पोलीस स्टेशन बांधता येत नाही अन् निघाले…’, अजित पवारांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल

यावेळी परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार धनंजय मुंडे विरुद्ध शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे बाजी मारणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्य लढत होत आहे.

follow us