Anuradha Nagawade : विधानसभेच्या निवडणुकांसाठी (Assembly Election) येत्या काही दिवसांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यातच आता जिल्ह्यात लढती देखील स्पष्ट झाल्या आहेत. दरम्यान श्रीगोंदामध्ये तिरंगी लढत होणार आहे मात्र या ठिकाणी ठाकरे गटाच्या उमेदवार असलेल्या अनुराधा नागवडे (Anuradha Nagawade) यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. मतदार संघामध्ये नागरिकांच्या भेटीगाठी त्या घेत आहे. तसेच श्रीगोंदा-नगर मतदार संघात जन-आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने सुरु असलेल्या प्रचारादरम्यान जनकौल देखील नागवडे यांना मिळतो आहे. स्व. शिवाजीराव नागवडे उर्फ बापूंच्या काळापासून नागवडे कुटुंबावर विश्वास दाखवणारी ही सर्वसामान्य जनता याही वेळेला एकनिष्ठपणे आपल्या पाठीशी उभी राहील आणि मशाल चिन्हाच्या माध्यमातून आपल्या श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघात सुद्धा विजयाचा प्रकाश उजळून टाकेल, असा विश्वास यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांनी व्यक्त केला.
धमक असेल तर, समोरून हल्ला करा; आरएसएसच्या होमग्राउंडवर जाऊन राहुल गांधींचा जोरदार घणाघात
श्रीगोंदा मतदार संघामध्ये उमेदवाऱ्या या जाहीर झाल्या व त्यांनतर अर्ज माघारी घेतल्यांनंतर सध्या स्थितीला १६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामध्ये भाजपचे विक्रम पाचपुते, शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) अनुराधा नागवडे, वंचित आघाडीचे अण्णासाहेब शेलार व माजी आमदार राहुल जगताप या चौघांमध्ये मुख्य लढत होण्याची चिन्हे आहेत. मात्र दरम्यान नागवडे यांनी मतदार संघामध्ये प्रचाराचा झंझावात सुरु ठेवला असून गावोगावी जात त्या मतदार संघातील प्रश्न जाणून घेत आहे. तसेच मोठ्या संख्येने नागरिकांचा प्रतिसाद त्यांना मिळत असल्याने यंदा श्रीगोंदा मतदार संघामध्ये मशाल हि पेटणार असा विश्वास देखील नागवडे यांनी व्यक्त केला आहे.
Ahmednagar Assembly Election: आघाडीतील बंड शमले ! शशिकांत गाडे यांचा अभिषेक कळमकरांना पाठिंबा
पाचपुते कुटुंबीयांनी निर्णय घेत प्रतिभा पाचपुते यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे विक्रम पाचपुते हे भाजपच्या चिन्हावर रिंगणात असणार आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेच्या अनुराधा नागवडे यांचे आव्हान असणार आहे. तर माजी आमदार राहुल जगताप व वंचित आघाडीचे अण्णासाहेब शेलार यांच्या उमेदवारीने श्रीगोंद्याच्या निवडणुकीत मोठी रंगत निर्माण झाली आहे. २०१४ व २०१९ या निवडणुकीत सरळ लढत झाली होती. या निवडणुकीत अनुराधा नागवडे, राहुल जगताप व अण्णासाहेब शेलार हे पाचपुते विरोधी आघाडीतील तिघे उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
मतदारसंघातील अंधार नाहीसा करण्यासाठी ‘मशाल’
‘मशाल’ हे शुभकार्याचे प्रतिक असते. पुरातन काळात तर अनेक राजे महाराजे यांनी ‘मशाल’ घेऊन साम्राज्य विस्तार केला होता. म्हणजे अंधारला नाहीसे करण्यासाठी ‘मशाल’ घ्यावी लागतेच. त्यामुळे आपल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आपण घेतलेली हि ‘मशाल’ आपल्या मतदारसंघातील समस्या व अडचणी जाळून टाकेल आणि त्यातून विकासाचा प्रकाश जुळून निघेल, असा विश्वास अनुराधा नागवडे यांनी व्यक्त केला.