संग्राम जगताप यांच्यामुळे नगरच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना, वाडियापार्कच्या नूतनीकरणासाठी 72 कोटींचा निधी मंजूर
Sangram Jagtap : आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी कायम नगरच्या क्रीडा क्षेत्राला सहकार्य व प्रोत्साहन दिले आहे. शहरात होणाऱ्या सर्व क्रीडा स्पर्धांना आमदार संग्राम जगताप कायम सहकार्य करत असतात. त्यांच्या प्रयत्नातून व पाठपुराव्यामुळे नगर जिल्ह्यातील पहिले भव्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी त्यांनी राज्य सरकारकडून तब्बल 21 कोटीचा रुपयांचा निधी मिळवला आहे.
तसेच नगरची शान असलेल्या ऐतिहासिक वाडियापार्क मैदानाच्या (Wadiapark Ground) नूतनीकरणासाठीही 51 कोटी रुपयांचा निधी आमदार संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडून मंजूर करून आणला आहे. या दोन्ही मोठ्या कामांमुळे नगरच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून अनेक नवनवीन खेळाडू नगर मधून निर्माण होतील. भविष्यात नगरच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांची हॅट्रिक होणे आवश्यक आहे. यासाठी सहकार क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे, असे प्रतिपादन हमाल पंचायतीचे अध्यक्ष व खेळाडू अविनाश घुले (Avinash Ghule) यांनी केले.
शहरातील सहकार क्रीडा मंडळ या जुन्या क्रीडा संस्थेच्या वतीने महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांना पाठिंबा देण्यात आला. यावेळी अविनाश घुले बोलत होते. क्रीडा भारतीचे अध्यक्ष सुधीर चपळगावकर, ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक अजय पवार, राजू निंबाळकर, राजेंद्र धिरडे, संजय क्षीरसागर, राजेश सबलोक, बाबर सर, साबळे सर, अजय चितळे, संजय ढोणे, आशुतोष कुकडे, राहुल चव्हाण, राहुल फुलसौदार, राजेंद्र ससे, नितिन मरकड, सुनील विधाते, हेमंत थोरात, अभिजीत खोसे, प्रदीप बहिरवाडे, राजेंद्र कुदळे व बाबा जाधव आदी खेळाडू उपस्थित होते.
आ.संग्राम जगताप म्हणाले, नगरमच्या अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी नगरचे नावलौकिक देशात प्रदेशात उंचावले आहे. यामध्ये सहकार क्रीडा मंडळाचे मोठे योगदान आहे. येणाऱ्या काळात अजून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत तसेच भावी पिढीला शहरात चांगले मैदाने उपलब्ध व्हावेत यासाठी अद्यावत व सर्व सोयी सुविधांयुक्त असे भव्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नगरमध्ये उभारले जात आहे.
‘मी देखील भाजपसोबत जाऊ शकलो असतो पण…’, उद्धव ठाकरेंचा CM शिंदेंवर हल्लाबोल
नगरच्या ऐतिहासिक वाडियापार्क मैदानाच्या विकासासाठीही 51 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने खेळाडूंना या ऐतिहासिक मैदानवर लवकरच अद्यावत व चांगल्या सुविधा मिळणार आहेत. नगरचा क्रीडा क्षेत्राचा वारसा सहकार क्रीडा मंडळ उत्तम प्रकारे जपत असून खेळाडूंना प्रोत्साहन देत घडवत आहे. यावेळी प्रशिक्षक गणेश औटी प्रास्ताविक केले. हेमंत थोरात यांनी आभार मानले.