Download App

विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच ‘या’ 7 जणांना लागली लॉटरी, मिळाली थेट आमदारकी!

Maharashtra Election 2024 : राज्यात आज विधानसभेसाठी बिगुल वाजणार आहे मात्र त्यापूर्वीच राज्यात मोठी राजकीय घडामोडी घडली असून

  • Written By: Last Updated:

Maharashtra Election 2024 : राज्यात आज विधानसभेसाठी बिगुल वाजणार आहे मात्र त्यापूर्वीच राज्यात मोठी राजकीय घडामोडी घडली असून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी 7 आमदारांचा शपथविधी आज विधान भवनामध्ये पार पडला. भाजप 3, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 2 आणि शिवसेनेच्या  ( एकनाथ शिंदे) 2 आमदारांनी शपथ घेतली आहे.

मात्र या शपथविधीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अनुपस्थित होते. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी कोणत्या सात आमदारांची लॉटरी लागली याबाबत माहिती जाणून घेऊया.

पंकज भुजबळ

आज विधान परिषदेसाठी राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी शपथ घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ नाराज असल्याचे बातम्या समोर येत होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी पंकज भुजबळ यांना विधान परिषदेसाठी संधी देत छगन भुजबळ यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

इद्रिस नायकवडी

विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी मुस्लिम समाजाला आकर्षित करण्यासाठी अजित पवार यांनी इद्रिस नायकवडी यांना विधानसभेसाठी संधी देत सोशल इंजीनियरिंग केली आहे. नायकवडी हे सांगली-मिरज- कुपवाड महापालिकेचे माजी महापौर असून ते अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. काही दिवसापूर्वी विधान परिषदेमध्ये एक जागा अल्पसंख्यांकांना देण्यात येईल असा शब्द अजित पवार यांनी दिला होता.

मनीषा कायंदे

तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाचा महिला चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनीषा कायंदे यांना विधान परिषदेची संधी दिली आहे. काही दिवसांपूर्वी विधान परिषद आमदार असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला होता.

हेमंत पाटील

तर यावेळी माजी खासदार हेमंत पाटील यांना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेसाठी संधी दिली आहे. लोकसभेत संधी न मिळाल्याने त्यांना आता आमदारकी देण्यात आली असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. चित्रा वाघ भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील आज विधान परिषदेसाठी आमदारकीची शपथ घेतली आहे.

चित्रा वाघ

यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला होता. महिला प्रश्नानांवर सातत्याने आवाज उठवणारा भाजप चेहरा म्हणून चित्रा वाघ ओळखल्या जातात. विक्रांत पाटील तर भाजपकडून यावेळी विक्रांत पाटील यांना देखील विधान परिषदेसाठी संधी देण्यात आली आहे.

विक्रांत पाटील

भाजपचे प्रदेशचे सरचिटणीस आहेत. माहितीनुसार विक्रांत पाटील हे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे निकटवर्तीय आहेत.

ऑनलाइन फसवणूक विरोधात होणार जनजागृती, आयुष्मान खुराना Meta सोबत राबवणार विशेष मोहीम

महंत बाबूसिंह महाराज

तर भाजपकडून महंत बाबूसिंह महाराज यांना देखील विधानसभेसाठी संधी देण्यात आली आहे. ते विदर्भातील पोहरादेवी या बंजारा समाजाच्या धार्मिक संस्थानाचे महंत आहेत. बंजारा समाजाची मतं आपल्याकडे खेचून आणण्यासाठी भाजपने त्यांना संधी दिली असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

follow us