Congress Third List : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये काँग्रेसने (Congress) 16 उमेदवारांची घोषणा केली आहे. अंधेरी पश्चिममधून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
वांद्रे पूर्वमधून आसिफ झकेरिया यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर दिग्रसमधून काँग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर तुळजापूरमधून कुलदीप धिरज कदम-पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. तर सांगली विधानसभा मतदारसंघातून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मेळघाटमधून डॉ. हेमंत नंदा, गडचिरोलीमधून मनोहर पोरेटी, नांदेड दक्षिणमधून मोहनराव मारोतराव अंबाडे, मालेगाव मध्यमधून एजाज बेग ,इगतपुरीमधून लकी बिका जाधव, भिवंडी पश्चिममधून दयानंद मोतीराम चोरघे, कोल्हापूर उत्तरमधून राजेश भरत लाटकर, सांगलीमधून पृथ्वीराज गुलाबराव पाटील, चंद्रवदमधून शिरीषकुमार कोतवाल यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित ‘केंद्रीय चुनाव समिति’ की बैठक में महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए कांग्रेस उम्मीदवारों की तीसरी लिस्ट। pic.twitter.com/0nrRV7gcPz
— Congress (@INCIndia) October 26, 2024
पानचिंचोली येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश, संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले स्वागत
काँग्रेसने आतापर्यंत विधानसभा निवडणुकीसाठी 87 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पहिल्या यादीमध्ये 48 तर दुसऱ्या यादीमध्ये 23 आणि तिसऱ्या यादीमध्ये काँग्रेसने आपल्या 16 उमेदवारांची घोषणा केली आहे.
महायुती आल्यावर तुळजाभवानी मंदिरासाठी 1300 कोटींचा निधी, राणाजगजितसिंहने मांडला लेखाजोखा