Udhav Thackeray Group : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरु असून उमेदवारांकडे अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक आहेत. अशातच महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या भेटीनंतर जो बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेणार नाही, त्याच्यावर पक्षाकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा ठाकरे गटाकडून (Udhav Thackeray Group) देण्यात आलायं. दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली.
कट्टर विरोधकाकडून जरांगे पाटलांच्या निर्णयाचं स्वागत; देर आए दुरुस्त आए, नक्की काय म्हणाले भुजबळ?
या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले, आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रच निवडणूक लढवणार आहोत. आज अनेक बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. एकमेकांविरोध निवडणूक न लढवण्याची आमची भूमिका आहे. महाविकास आघाडीत तिन्ही पक्षातील ज्यांनी बंडखोरी करत जे उमेदवार अर्ज दाखल केलेत, ते अर्ज मागे घेतील, असा विश्वास असल्याचं संजय राऊत यांनी दिलायं.
महायुतीत किती ठिकाणी मैत्रिपूर्ण लढत? शिंदे – फडणवीसांमध्ये 4 तास खलबतं, आज होणार फैसला
तसेच दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार असून आम्ही अलिबाग, पेण आणि पनवेल येथील उमेदवारी अर्ज मागे घेतोयं. त्या जागा शेकाप पक्षाला जातील आणि आमच्या पक्षातील ज्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांनी अर्ज मागे घ्यावेत. जर त्यांनी आज अर्ज मागे घेतले नाहीत, तर त्यांच्यावर पक्षांकडून कारवाई करण्यात येईल. त्यांना पक्षाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा उद्धव ठाकरे गटाकडून देण्यात आलायं.
‘माझा आव्हाडांना सल्ला, शब्द विचारपूर्वक वापरा..’; ‘पाकिटमार’ वक्तव्यावरून भुजबळांच्या कानपिचक्या
मैत्रीपूर्ण लढाई मान्य नाही – शरद पवार
दुसरीकडे माकपच्या कराळे यांनी नाशिक पश्चिममधून उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढाया या तिन्ही पक्षासाठी हितकारक नाहीत. मैत्रीपूर्ण लढाईच्या रस्त्याने जायची आमची तयारी नाही. मैत्रीपूर्ण लढाई तिन्ही पक्षाला न परवडण्यासारख्या आहेत, मैत्रीपूर्ण लढाई लढण्याचा आमचा विचार नाही, ती आम्हाला मान्य नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.