Download App

Video : जरांगें वेडे अन् जानकरांचं GPS हुकलेलं; एका बाणात हाकेंचा दोघांवर बोचरा वार

महादेव जानकर ज्यावेळी आमदार झाले आणि मंत्री झाले त्याचवेळी त्यांच्यातील ईरा संपलेला आहे.

  • Written By: Last Updated:

पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभेसाठी उमदेवार उभे करणार असल्याची घोषणा केली आहे. नेमके किती आणि कोणते उमेदवार जरांगे निवडणुकीच्या रणांगणात उतरवणार याची अंतिम यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, त्यापूर्वी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी जरांगेंचा मास्टर प्लान फोडून मोकळे झाले आहेत. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. (Laxman Hake On Mahadev Jankar & Manoj Jaranage)

मनोज जरांगे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार?, लेट्सअप मराठीशी बोलताना केला मोठा खुलासा

हाके म्हणाले की, जरांगे आज एक बोलतील आणि उद्या एक बोलतील. पण, ते काही निवडणुकीसाठी उमेदवार वगैरे देणार नाही. एवढचं काय तर ते 4 नोव्हेंबरनतंर हॉस्पिटलमध्ये सलाईन लावून अॅडमिट असतील असा दावादेखील हाके यांनी केला आहे. मनोज जरांगेंना (Manoj Jarange) राजाकारणातील ज्ञान शून्य असून, ते वेडे आहेत काहीही बरळतात असा बोचरा वारही हाके यांनी केला,

त्यांच्या उमेदवारांची वाट बघतोय

जरांगे यांनी उमेदवार उभे करावेत याची मी वाट बघत असून, कुठल्या लोकांना मतदान करायचे नाही त्याची यादी तयार असल्याचेही हाके यांनी सांगितले. तसेच काही ठिकाणी आमचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असतील असेही हाके यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे हा भंपक माणूस, त्यांची माझ्यावर बोलण्याची लायकी; लक्ष्मण हाके संतापले

सर्वच राजकीय पक्षांचे ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष

पुढे बोलताना हाके म्हणाले की, आज प्रत्येकजण जरांगेंची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये दाखल होत आहे. पण, ओबीसींकडे या राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी, नेत्यांनी दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे ओबीसी सामाजातील नागरिकांना माझी विनंती आहे की, आता जर तुम्ही घरात बसलात तर, 2024 नंतर ओबीसींचे आरक्षण संपलेले असेल. पण, याबाबत योग्य ती दिशा आम्ही ओबीसींना दिली असून, ते मतपेटीतून दाखवून देतील असेही हाके यांनी सांगितले.

पक्ष अन् चिन्हानंतर आता दादांचा पाडव्यावरही दावा?; पोस्टमधील एका वाक्यामुळे चर्चांना उतं…

आमचे उमदेवार तयार

विधानसभेसाठी आमचे उमदेवार तयार असून, कुणाला मतदान करायचे आणि कुणाला द्यायचे नाही याचं नियोजन तयार असून, यात रोहित पवार, तानाजी सावंत आणि राजेश टोपे संदीपान भुमरे या नेत्यांना ओबीसींचे एकही मत पडणार नाही. या नेत्यांशिवाय बीड आणि जालना जिल्ह्यातील अनेका आमदारांची नावेदेखील यादीत नमुद असल्याचे हाके म्हणाले. या सर्वांचा खुलासा 4 तारखेला होईल असे म्हणत या राज्यातील ओबीसींचा काय अंडर करंट आहे हे तुम्हाला दिसेल यासाठी योग्य ती दिशा ओबीसी समजाला दिली असून, ती ओबीसी मतपेटीतून निश्चित दाखवेल असा विश्वास हाकेंनी व्यक्त केला.

VIDEO : सर्व बंडोबा आमचेच त्यांना समजावण्यात यशस्वी होऊ; फडणवीसांना ‘सो’ टक्का विश्वास

राजकीय गुरू जानकरांचं GPS गंडलयं

जरांगेंवर हल्लाबोल केल्यानंतर हाके यांनी त्यांचे राजकीय गुरू असलेल्या महादेव जानकर यांच्यावरही तोफ डागली. ते म्हणाले की, महादेव जानकर ज्यावेळी आमदार झाले आणि मंत्री झाले त्याचवेळी त्यांच्यातील ईरा संपलेला आहे. त्यांना कोणाच्याही भावाना आणि प्रश्नांचं घेणदेणं राहिलेलं नसून, ओबीसी संभ्रमावस्थेत असताना जानकर नेमके काय करत होते? या प्रश्नाचं उत्तर राज्यातील लोकांना मिळालेलं नाही. जानकरांचं GPS गंडलं असून, त्यांना जायचं होतं दिल्लीला पण ते केरळच्या जंगलात कुठे तरी जाऊन बसलेले आहेत. जानकरांनी त्यांच्या सुधारणा करावी आणि त्यांचं जीपीएस सुधारून घ्यावं असा सल्लाही हाके यांनी त्यांना दिला,

 

follow us