Harshvardhan Patil : आज इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी इंदापूर विधानसभेसाठी शरद पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बोलताना त्यांनी आमदार दत्ता भरणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. दुर्बीण लावली तरी विकासकामे दिसत नाहीत, अशा शब्दात निशाणा साधला. ज्यांनी तुम्हाला आमदार केलं, मंत्री केलं. त्याच पवार साहेबांना तुम्ही दगा दिला, याचा हिसका जनता 20 तारखेला दाखवेल, असा इशाराही पाटील यांनी दिला.
सरकार घालवण्यासाठी जनता सुसज्ज ; इस्लामपूरमधून शक्तिप्रदर्शन करत जयंत पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गुरुपुष्यामृत असल्याने आज मी अर्ज भरला. लोकशाहीत जनता जर्नादन गुरू आहे. या गुरूंच्या आशिर्वादाने मी इंदापूर विधानसभा निवडणुकीचा फॉर्म भरला. शरद पवार पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करून आशिर्वाद मागायला आलो. तुमचा पाठिंबा आहे का, तुतारीला मतदान करणार का? असा सवाल करताच रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
पुढं त्यांनी दत्ता भरणेंवर टीका केली. ते म्हणाले, 2009 मध्ये माझ्या विरोधात बंड केल्यानंतर सहा वर्षांसाठी तुम्हाला पक्षातून बडतर्फ केल, पण दोन वर्षात परत आला. ज्यांनी तुम्हाला आमदार कोणी केलं, मंत्री केलं, त्याच पवार साहेबाना तुम्ही दगा दिला, याचा हिसका जनता 20 तारखेला दाखवेल, अशा इशाराही त्यांनी भरणेंना दिला.
मी तालुक्यात गुंडगिरी वाढू दिली नाही. आज दहा वर्षात काय चालले आहे? असा सवाल करत उद्याच्या विधानसभेतील निवडणुकीत किती रंगी आहे माहित नाही. पण, तुतारीमय आहे हे नक्की. महाराष्ट्राच्या विधानसभेत तुतारीचं वाजणार, असा विश्वास पाटील यांनी केला.
आम्ही पक्ष बदलला, पण स्वार्थासाठी बदलला नाही. जनतेच्या आवाजासाठी बदला. जनतेनं सांगितलं पवार साहेबांसाबोत जा. तालुक्याची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी पवार साहेबांना साथ दिली. राज्याची मोडकळीस आलेली अवस्था पूर्ववत करायची असेल, रयतेचं राज्य आणायचं असेल तर तुतारी शिवाय पर्याय नाही, याची जाणीव झाल्यानं तुतारी हाती घेतली. प्रशासन चालवण्यासाठी चांगल्या माणसांची गरज असते. त्यामुळे पवार साहेबांनी देखील माझा विचार केला असेल, असं पाटील म्हमाले.
आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या, पण कोणी साड्यांचे वाटप केले आहे का? तुम्हाला तेलाचा डबा वाटला का? मग आज ही वेळ का? असा सवाल करत सहा हजार कोटींची कामं झाली असं सांगता, पण दुर्बीण लावली तरी विकास कामं दिसत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
प्रवीण माने यांच्या नाराजीबाबत बोलताना पाटील म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला आपली इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे, सर्वांची नाराजी दूर केली जाईल. प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे हे आमच्या जवळचे आहेत, त्यामुळे त्यांची नाराजी आम्ही लवकरच दूर करू, असं ते म्हणाले.