Download App

आमचा कारभार जनतेतून, मी काय पहाटे उठून…; हर्षवर्धन पाटलांची अजितदादांवर खोचक टीका

मी काय पहाटे उठून कुठं जात नाही, आमचा कारभार जनतेतून चालतो, अशी खोचक टीका हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांवर केली.

  • Written By: Last Updated:

Harshvardhan Patil on Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीपूर्वी (Vidhansabha Elction) भाजपची (BJP) साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटामध्ये प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटलांनी (Harshvardhan Patil) उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) खोचक टीका केली. अजित पवारांनी रोज इंदापुरात यावं, टीका करावी. मी स्वागतच करतो. मी काय पहाटे उठून कुठे जात नाही, आमचा कारभार जनतेतून चालतो, अशी खोचक टीका केली.

लोकसभेला रुसले, शिंदेंबरोबर गेले, मुलाला तिकीट मिळताच बबनराव घोलपांची घरवापसी… 

हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करतांना बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विजयासाठी आपण अदृश्य प्रचार केल्य़ाचं वक्तव्य केलं होतं. याचवरून इंदापूर येथील जाहीर सभेत अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांचा दलबदलू असा उल्लेख केला. तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? एकीकडे तुम्ही आम्हाला घरी नेलं, जेवायला घातलं, ओवाळलं. आता म्हणताय आम्ही अदृश्य प्रचार केला. याला आता तर… टांग्याचा घोडा कसा असतो, तसं… ही लोकं कोणाची नाहीत, असं म्हणत अजित पवारांनी जाहीर सभेत हर्षवर्धन पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

लेकासाठी बाप मैदानात; बारामतीत लोकसभेची पुनरावृत्ती?, अजित पवारांच्या विरोधात भावाने फोडला नारळ 

दरम्यान, आज माध्यमांशी हर्षवर्धन पाटील यांनी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. अजित पवारांनी केलेल्या टीकेविषयी विचारलं असता हर्षवर्धन पाटलांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलं. अजित पवार हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेते आहेत. महाराष्ट्रातील कोणत्याही मतदारसंघात जाऊन कोणाबद्दल काहीही बोलण्याचा अधिकार फक्त अजितदादांनाच आहे. त्यांनी रोज इंदापुरात यावं, टीका करावी. मी स्वागतच करतो. मी काय पहाटे उठून कुठं जात नाही, आमचा कारभार जनतेतून चालतो, अशी खोचक टीका पाटील यांनी केली.

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांना पहाटेच्या शपथविधीवरून केलेल्या टीकेला आता अजित पवार काय प्रत्युत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us