लोकसभेला रुसले, शिंदेंबरोबर गेले, मुलाला तिकीट मिळताच बबनराव घोलपांची घरवापसी…

  • Written By: Published:
लोकसभेला रुसले, शिंदेंबरोबर गेले, मुलाला तिकीट मिळताच बबनराव घोलपांची घरवापसी…

Babanrao Gholap : विधानसभा निवडणुकीच्य (Vidhansabha Election) आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेला (Shivsena) नाशिकमध्ये मोठा धक्का बसला. ठाकरे गटाने देवळाली मतदारसंघातून माजी आमदार योगेश घोलप (Yogesh Gholap) यांना उमेदवारी जाहीर केल्याने माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत बबनराव घोलप यांचा पक्षप्रवेश झाला.

लेकासाठी बाप मैदानात; बारामतीत लोकसभेची पुनरावृत्ती?, अजित पवारांच्या विरोधात भावाने फोडला नारळ 

बबनराव घोलप हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होते. ६ एप्रिल रोजी त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र, त्यांचे योगेश घोलप हे ठाकरे गटातच राहिले. त्यानंतर आता योगेश घोपल यांना ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी देवळाली मतदारसंघातून तिकीट दिले. पुत्र घोलप यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिल्याने बबनराव घोलप यांनी तडकाफडकी शिंदे गटाचा राजीनामा दिला.

शिवसेनेने वाढवली चंद्रकांतदादांची डोकेदुखी; कोथरुडमधील मतांची फाटाफूट पडणार भारी 

बबनराव घोलप यांनी आज (27 ऑक्टोबर) रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला.

शिंदे यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून समाजाच्या अपेक्षा पूर्ण होऊ न शकल्याने आपण शिंदे गटाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले. तसेच पुत्र योगेशला उमेदवारी देऊन आपल्यावर ठाकरेंनी मोठे उपकार केल्याचंही त्यांनी नमुद केलं.

दरम्यान, बबनराव घोलप हे देवळाली विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा विधानसभेवर गेले होते. त्यांनी राज्याचे समाजकल्याण मंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यांची कन्या नयन घोलप-वालझाडे यांना ठाकरे गटाने नाशिकच्या महापौरपदी नियुक्ती केलं होतं. तर मुलगा योगेश घोलप यांना विधानसभेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी ठाकरेंनी दिली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube