शिवसेनेने वाढवली चंद्रकांतदादांची डोकेदुखी; कोथरुडमधील मतांची फाटाफूट पडणार भारी

शिवसेनेने वाढवली चंद्रकांतदादांची डोकेदुखी; कोथरुडमधील मतांची फाटाफूट पडणार भारी

Chandrakant Mokate Candidate from Kothrud constituency : कोथरुड मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena Thackeray Group) माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना (Chandrakant Mokate) उमेदवारी जाहीर केलीय. यामुळे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची डोकेदुखी यामुळे चांगलीच वाढणार आहे. भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी बंडखोरीची तयारी केलीय. अशातच आता कोथरुडमधील (Kothrud constituency) तीन उमेदवारांमुळे होणाऱ्या मतांच्या फाटाफुटीचा पाटील यांना फटका बसू शकतो.

कोथरुड मतदारसंघातून भाजपतर्फे चंद्रकांत पाटील, मनसेतर्फे किशोर शिंदे यांना उमेदवारी अगोदरच जाहीर झालीय. शिवसेना ठाकरे गटाकडून ही जागा कोणाला मिळते? याची उत्सुकता (Assembly Election 2024) होती. अमोल बालवडकर ठाकरे गटात प्रवेश करून मशाल हाती घेतील अशी चर्चा होती. मात्र, ठाकरे गटाने मोकाटे यांना उमेदवारी दिली आहे. पाटील यांच्यासाठी त्यामुळे निवडणूक सोपी झाल्याचे वरकरणी दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र फटकाच बसणार आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याचे कारण म्हणजे पाटील, मोकाटे आणि शिंदे हे तीनही उमेदवार कोथरुड परिसरातील आहेत.

नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांनी शोधला भिडू; अभिनेत्री स्वरा भास्करच्या पतीला दिलं तिकीट

मोकाटे यांनी यापूर्वी येथून आमदारकीसह नगरसेवक पदावरही काम केलंय. त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांचा प्रभाव चांगला आहे. मनसेचे किशोर शिंदे यांनी गेल्या वेळी लढताना चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात 79, 751 मते घेतली होती. यातील बहुतांश मते ही कोथरुडमधील होती. बाणेर – बालेवाडी भागात ते मागे पडले होते. या भागातील मताधिक्याच्या जोरावरच चंद्रकांत पाटील यांचा 25 हजार मतांनी विजय शक्य झाला होता.  एका बाजुला कोथरुडमधील तीन उमेदवार आणि दुसऱ्या बाजुला बालवडकर अशी लढत झाल्यास बाणेर- बालेवाडीच्या स्थानिक अस्मितेचा लाभ बालवडकरांना होऊ शकतो. याशिवाय पाटील यांच्यावर बाहेरचा उमेदवार हा शिक्का अद्यापही आहे. त्यामुळे कोथरुडमधील नागरिकांनाही मोकाटे किंवा शिंदे यांच्या रुपाने पर्याय मिळू शकतो.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत अक्षय कर्डिले धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला…

अमोल बालवडकर यांना अपक्ष उभे राहण्याचा फायदा!

अमोल बालवडकर यांनी शिवसेनेची उमेदवारी घेण्यापेक्षा अपक्ष लढण्यास पसंती दिल्याचीही मतदारसंघात चर्चा आहे. याचे कारण म्हणजे बाणेर- बालेवाडीच्या उच्छभ्रु सोसायटी भागात त्यांचे चांगले काम आहे. नगरसेवक म्हणून त्यांचा संपर्क आहे. त्यांनी आपली नाराजी पक्षाबद्दल नसून चंद्रकांत पाटील यांच्या कार्यपध्दतीवर असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भाजप विचारांचा मतदारही त्यांना पाठिंबा देऊ शकतो.  कोथरुडमध्ये आता चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. येथील मतदार संख्या चार लाख आहे. आजपर्यंतचा अनुभव पाहिला तर पन्नास टक्केंपेक्षा जास्त मतदान होत नाही. त्यामुळे सुमारे दोन ते सव्वा दोन लाख मतदान होईल. त्यातील सत्तर हजार मतेही विजयापर्यंत नेण्यासाठी पुरेशी ठरतील.  इतकी मते घेण्याची तीनही उमेदवारांची क्षमता आहे. त्यामुळेच विद्यमान आमदार चंद्रकांतदादांसमोर चिंता आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube