Download App

रविकांत तुपकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, तुपकर मशाल हाती घेणार?, पडद्यामागे काय घडतंय?

रविकांत तुपकरांनी Ravikant Tupkar) मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली.

  • Written By: Last Updated:

Ravikant Tupkar met Uddhav Thackeray : आगामी विधानसभा निवडणूकींच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. आता शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी Ravikant Tupkar) मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली. त्यानंतर तुपकरांना बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) उमेदवारी मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. दरम्यान, या भेटीबाबत त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर (Sharvari Tupkar) यांनी माहिती दिली. मात्र, दोघांमध्ये काय चर्चा झाली याची माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Video : दसऱ्याच्या तोंडावर करोडो गरिबांना मोदींचं गिफ्ट; डिसेंबर 2028 पर्यंत मिळणार मोफत तांदूळ 

तुपकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली असून महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत त्यांची बैठक झाल्याची बुलढाण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. तसेच तुपकर यांच्या पत्नी ऍड. शर्वरी तुपकरही निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. यासंदर्भात शर्वरी तुपकरांनी सांगितलं की, काल रविकांत तुपकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आज बुलढाण्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. महाविकास आघाडीने रविकांत तुपकरांना पाठिंबा दिल्यास चांगलंच होईल, असं मत शर्वरी यांनी व्यक्त केलं.

त्या म्हणाल्या, मात्र या भेटीत काय चर्चा झाली याचे तपशील मला माहिती नाही. महाविकास आघाडीने रविकांत यांना पाठिंबा दिला अलेल कप नक्कीचं चांगलं होईल. आज कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, बुलढाणा मतदारसंघात लोकांना बदल हवा आहे, त्यामुळे कार्यकर्ते खूश आहेत आणि कामाला लागले आहेत, असंही शर्वरी यांनी म्हटलं.

Nikshay Poshan Yojana : क्षयरुग्णांना दिलासा, मिळणार दरमहा 1000 रुपये, केंद्र सरकारचा मोठा निर्णय 

बुलढाण्यातील आग्या मोहोळ उठवायला रविकांत तुपकर यांच्या हाती मशाला… अशा घोषणा कार्यकर्ते देत आहेत. मात्र, मी विधानसभा निवडणूक लढवायची की नाही हे माझे सहकारी आणि शेतकरी ठरवतील, असेही शर्वरी तुपकर यांनी सांगितले.

लोकसभेला रविकांत तुपकरांना अडीच लाख मते

बुलढाणा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून रविकांत तुपकर यांना उमेदवारी दिली जाईल, असा अंदाजही वर्तवला जात आहे. तर आगामी काळात तुपकर महाराष्ट्र दौरा करत असून सुमारे 25 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

तुपकर हे बुलढाणा मतदारसंघातून अपक्ष म्हणून लोकसभेला उभे होते. यावेळी त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांना सुमारे अडीच लाख मते त्यांना मिळाली. अशा स्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीत मतांचे विभाजन आणि नुकसान टाळण्यासाठी रविकांत तुपकर यांना सोबत घेण्याबाबत महाविकास आघाडीत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे समोर आलं. मातोश्रीवरील तुपकर आणि ठाकरेंच्यात नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, विधानसभेलाछी मविआने तुपकरांना उमेदवारी दिल्यास त्याचा महाविकास आघाडीला नक्कीच फायदा होऊ शकतो.

कोण आहेत रविकांत तुपकर?

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. राजू शेट्टींच्या विरोधात भूमिका घेतल्याने तुपकर यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर पुण्यात महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीची घोषणा करत बुलढाण्यातील सहा जागांसह 25 मतदारसंघांतून निवडणूक लढवण्याची तयारी तुपकरांनी केली.

follow us