बूथ प्रमुख हा भाजपचा कणा, झपाटून कामाला लागा; आ. संभाजीराव पाटील निलंगेकरांचे आवाहन

बुथ प्रमुख हा पक्षाचा कणा असून आगामी निवडणूक (Vidhansabha Election) अत्यंत महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने बुथ प्रमुखांनी झपाटून कामाला लागावे

Sambhajirao Patil Nilangekar

Sambhajirao Patil Nilangekar

निलंगा : बुथ प्रमुखांच्या कामगिरीच्या बळावरच भारतीय जनता पक्षाने (BJP) आजवर अनेक निवडणुका जिंकल्या आहेत. बुथ प्रमुख हा पक्षाचा कणा असून आगामी निवडणूक (Vidhansabha Election) अत्यंत महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने बुथ प्रमुखांनी झपाटून कामाला लागावे, असे आवाहन माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेक (Sambhajirao Patil Nilangekar) यांनी केले.

कसब्यात पुन्हा रासने तर खडकवासला आणि कॅन्टोन्मेंटमध्ये विद्यमानांना संधी… 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निलंगा मतदारसंघातील निटूर, अंबुलगा आणि शेडोळ गटातील बुथ प्रमुखांच्या विजय संकल्प मेळाव्यात मार्गदर्शन करताना निलंगेकर बोलत होते. या मेळाव्यास भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, मध्यप्रदेशातील नर्मदा नमामि गंगा अभियानाचे राजीव पटेल, विधानसभा प्रभारी दगडू सोळुंके संजय दोरवे, तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, शेषेराव ममाळे, बाजार समिती उपसभापती लालासाहेब देशमुख, माजी जि.प. सदस्य व्यंकट धुमाळ, धोंडिराम बिराजदार, विजय देशमुख, रोहित पाटील, ऋषिकेश बद्दे, माजी सभापती गोविंद चिलकुरे, माधवराव पाटील, स्वरूप धुमाळ, ऊषा गवारे ,सतिश धुमाळ यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

IND vs NZ : टीम इंडियाला धक्का अन् न्यूझीलंडने रचला इतिहास, दुसऱ्या कसोटीसह मालिका जिंकली 

यावेळी बोलताना निलंगेकर म्हणाले की, आजवरच्या प्रत्येक निवडणुकीत बूथप्रमुखांनी महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. या निवडणुकीसाठीही तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. राज्याच्या भवितव्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे .त्यामुळे बूथप्रमुखांनी प्रत्येक मतदाराशी संपर्क साधत केंद्र आणि राज्य सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती मतदारांना द्यावी. पक्षाने केलेली विकासकामे मतदारांना सांगावीत, असे आवाहन त्यांनी केले.

कामाचा माणूस हवाय की, केवळ माणूस हवाय?
निलंगेकर म्हणाले की, या निवडणुकीत महायुती सरकार व महाविकास आघाडी सरकारच्या कार्याची तुलना होणारच आहे. परंतु आता मतदारांना कायम संपर्कात राहणारा उमेदवार हवाय की केवळ बोलघेवडा माणूस हवाय, याचाही निर्णय करावा लागणार आहे. बूथप्रमुखांनी ही बाब मतदारांच्याही निदर्शनास आणून द्यावी आणि आगामी २५ दिवस स्वतःला पक्षासाठी झोकून देत निलंगा विधानसभेसह राज्यात महायुतीचा झेंडा फडकवावा,असे आवाहनही निलंगेकर यांनी केले.

यावेळी अरविंद पाटील निलंगेकर व उपस्थितांची समायोचित भाषणे झाली. या मेळाव्यास बुथ प्रमुखांसह पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

केळगावमध्ये असंख्य युवकांचा भाजप प्रवेश..
आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे कार्य आणि नेतृत्वावर विश्वास ठेवत केळगाव येथील असंख्य युवकांनी शनिवारी भाजपात प्रवेश घेतला.आ.निलंगेकर यांनी या सर्वांचे स्वागत केले. ज्या विश्वासाने आपण भाजपासोबत आलात त्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही,अशी ग्वाही आ.निलंगेकर यांनी या युवकांना दिली.

Exit mobile version