Ayodhya Ram Mandir Update : अयोध्येतील राम मंदिर (Ayodhya Ram Temple) उद्घाटनाला आता काहीच दिवस शिल्लक असून, 22 जानेवारी रोजी अयोध्येतील उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीराम विराजमान होणार आहेत. त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी तीन कारागीरांनी रामलल्लांच्या (Ramlalas) वेगवेगळ्या मूर्ती बनवल्या आहेत. त्यापैकी एका मूर्तीची निवड केली जाणार असून, त्यासाठी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या आजच्या (दि.29) महत्त्वपूर्ण बैठकीत मंदिरात श्वेत की श्याम यापैकी कोणती मूर्ती बसवली जाणार याचा निर्णय घेतला जाणार आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी राजस्थानच्या सत्यनारायण पांडे यांनी श्वेत रंगाची मूर्ती बनवली आहे. तर, म्हैसूरचे अरुण योगीराज आणि बेंगळुरूचे जीएल भट्ट यांनी श्माम म्हणजेच कृष्णवर्णीय रंगाची मूर्ती बनवली आहे. बनवण्यात आलेल्या या मूर्ती नेमक्या कशा आहेत. त्याची खासियत काय आहे. याबाबत थोडक्यात आपण जाणून घेऊया. (Ramlalas Idol Features)
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : श्रीरामांच्या त्रेता युगाची आठवण करून देणारं अयोध्या स्टेशन!
कोणत्या मूर्तीचे वैशिष्ट्य काय?
म्हैसूरच्या अरुण योगीराज यांनी तयार केलेली गडद रंगाची रामललाची मूर्ती 51 इंच उंच आहे. धनुष्यबाण असलेल्या 5 वर्षाच्या बालपूपात ही मूर्ती साकारण्यात आली असून, ही मूर्ती कर्नाटकातील कृष्ण खडकाची आहे. याशिवाय राजस्थानच्या सत्यनारायण पांडे यांनी श्वेत वर्णीय रंगाची मूर्ती साकारली असून, या मूर्तीमध्येही रामलल्लाच्या हातात धनुष्यबाण असून, ही मूर्ती विशेष संगमरवरीपासून साकारण्यात आली आहे. ही मूर्ती कधीही खराब होणार नसल्याचाही दावा केला जात आहे. तर, बेंगळुरूच्या जीएल भट्ट यांनी 4 फूटांची श्याम वर्णीय मूर्ती बनवली आहे. ही मूर्तीही बालरूपात असून, मूर्तीच्या हातात धनुष्य दाखवण्यात आला आहे.
कशी होणार रामलल्लांच्या मूर्तीची निवड?
– राम मंदिर ट्रस्ट समिती रामलल्लांच्या मूर्तीची निवड करेल.
– बैठकीत मूर्ती निवडीचा प्रस्ताव मंजूर केला जाईल.
– प्रस्तावावर सर्व सदस्य चर्चा करतील.
– या दरम्यान मूर्तिकार मूर्तीची वैशिष्ट्ये सांगतील.
– शिल्पकारांचे म्हणणे ऐकून विश्वस्त सदस्य त्यांचे मत मांडतील.
– ट्रस्ट सदस्यांच्या मतानुसार निर्णय घेतला जाईल.
गरज भासल्यास ट्रस्टचे सदस्यही मूर्ती पाहण्यासाठी जातील.
Ayodhya Ram Mandir च्या उद्घाटन सोहळ्याचं खास निमंत्रण; कोण-कोणते बॉलिवूड स्टार्स लावणार हजेरी?
रामल्लांची मूर्ती साकारणारे तीन शिल्पकार कोण?
शिल्पकार सत्यनारायण पांडे हे राजस्थानचे प्रसिद्ध शिल्पकार असून, ते पारंपरिक कला, समकालीन महत्व असणाऱ्या मूर्तींची निर्मिती करतात. याशिवाय ते कटिंग, पॉलिसिंग आणि फेसिंगसाठी ओळखले जातात. गेल्या काही दशकांपासून त्यांनी एक उत्तम शिल्पकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
शिल्पकार जीएल भट्ट हे बेंगळुरूचे रहिवासी असून, त्यांची ख्याती भारत आणि परदेशातही आहे. भट्ट गेल्या 45 वर्षांपासून मूर्ती बनवत आहेत. भट्ट यांना 50 हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तर, अरुण योगीराज शिल्पी हे म्हैसूरचे शिल्पकार असून, 2008 मध्ये नोकरीला रामराम करत त्यांनी पूर्णवेळ शिल्पकाम करण्याचा निर्णय घेतला.
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिराचे पुजारी मोहित पांडे कोण आहेत?
भट्ट यांचे कुटुंब पाच पिढ्यांपासून मूर्ती बनवण्याचे काम करत असून, त्यांनी स्वतः 1 हजारहून अधिक मूर्ती बनवल्या आहेत. केदारनाथमध्ये आदि शंकराचार्यांची, इंडिया गेटवरील नेताजींचा पुतळा आदी शिल्प भट्ट यांनी साकारलेले आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी अनेकवेळा त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.