Download App

प्राणप्रतिष्ठेआधीच लुटारूंचा बाजार, देणगीच्या नावाखाली फसवणूक; विश्व हिंदू परिषदेचे सावधगिरीचे आवाहन

  • Written By: Last Updated:

Ram Mandir Donation :अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराच्या (Ram temple) प्राणप्रतिष्ठापनेची तयारी देशभर सुरू आहे. हा प्राणप्रतिष्ठेचा भव्य सोहळा 22 जानेवारीला होत आहे. हा सोहळा तोंडावर आलेला असतांना देणगीच्या नावाखाली लोकांना लुटणारे एक रॅकेट समोर आलं आहे. हे भामटे सोशल मीडियावर राम मंदिरासाठी बेकायदेशीर दान मागणारे संदेश पाठवत असून या संदर्भात विश्व हिंदू परिषदेने (Vishwa Hindu Parishad) केंद्रीय गृहमंत्रालय आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याकडे तक्रार केली आहे.

लगीनघाई! नव्या वर्षात रकुल प्रीत सिंह अडकणार लग्नबंधनात! ‘या’ दिवशी घेणार सात फेरे­

राम जन्मभूमीबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले. रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 करण्यात येणार आहे. त्याची तयारी सुरू झाली असून देशातील सर्व मान्यवरांना निमंत्रण पत्रे पाठवण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह 6000 हून अधिक लोक या भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, राम मंदिरासाठी  अवैधरित्या देणगी मागणारे एक रॅकेट सक्रीय झाले.

New Year : इतिहासातील सर्वात मोठी आतषबाजी ते युद्ध; पाहा जगभरात 2024 चं कसं स्वागत झालं? 

विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी ट्विटरवर याबाबत माहिती देतांना लोकांना सावध राहण्यास सांगितले. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या नावाने एक आयडी तयार करून राममंदिरासाठी देणगी मागणारा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संदेशात QR कोड आहे. हा QR कोड स्कॅन करून त्याद्वारे राम मंदिरासाठी देणगी देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पण, प्रत्यक्षात ट्रस्टकडून अशी कोणतीही देणगी गोळा करण्यात येत नसल्याचं बन्सल यांनी सांगितलं.

या संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालय, उत्तर प्रदेश सरकार आणि दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्याचे विहिंपच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

हा आनंदाचा क्षण आहे. आम्ही रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेा सोहळ्याचे आमंत्रण देत आहोत. सध्या कोणतीही देणगी स्वीकारली जात नसल्याचे विहिंपने म्हटले आहे. तसेच फसवणूक होऊ नये म्हणून लोकांनी सावध राहावं, असं आवाहनही परिषदेतर्फे करण्यात आलं. राम मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यानंतरही भामट्यांकडून अशाच प्रकारे अवैधरित्य देणग्या गोळा करण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या.

अयोध्येत रामल्लाच्या अभिषेकापूर्वी तीन दिवस भाविकांना दर्शन घेता येणार नाही. 20 आणि 21 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित केलेल्यांनाच रामल्लाचे दर्शन घेण्याची संधी मिळेल. 23 जानेवारीपासून सर्वसामान्य भाविकांना भव्य राम मंदिराचे दर्शन घेता येणार आहे.

follow us