Download App

चरणामृत सेवन करून मोदींनी सोडला उपवास; चरणामृत म्हणजे काय? सेवनाचे आहेत अनेक फायदे

  • Written By: Last Updated:

What is charanamrit? : अयोध्येमध्येत आज ( दि. 22 ) भव्यदिव्य मंदिरात रामांची प्राणप्रतिष्ठा पार पडली. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) 11 दिवसांचे व्रत  ठेवले होते. या दरम्यान, ते जमिनीवर झोपत होते. शिवाय रोज केवळ नारळपाण्याचे सेवन केले होते. त्यानंतर आज अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर मोदींनी गेल्या 11 दिवसांपासून सुरू असलेला उपवास चरणामृताचे सेवन करून सोडला. गोविंद देव गिरी महाराजांनी मोदींना स्वतःच्या हाताने  चरणामृत दिले. आता मोदींना उपवास सोडण्यासाठी ग्रहण केलेले चरणामृत म्हणजे काय? (charanamrit) चरणामृताच्या सेवनाचे नेमके फायदे काय? हे आपण जाणून घेऊया.

108 रुग्णवाहिकांची संख्या वाढली, सेवा आणखी जलद मिळणार : बोट अन् शिशू रुग्णवाहिकाही सेवेत 

चरणामृत कसे बनते?
हे नाव ऐकून तुम्हाला अंदाज आलाच असेल की चरणामृत हे देवाच्या चरणांचे अमृत आहे. भगवान शालिग्राम आणि तुळशीच्या पानांपासून चरणामृत बनवले जाते. तांब्याच्या भांड्यात चरणामृत स्वरूपात पाणी ठेवल्याने त्यात तांब्याचे औषधी गुणधर्म येतात. चरणामृतमध्ये तुळशीची पाने, तीळ आणि इतर औषधी तत्व टाकतात.

चरणामृत घेण्याचे नियम
शास्त्रानुसार चरणामृत घेण्याचेही नियम करण्यात आले आहे. चरणामृत घेतल्यानंतर अनेकजण डोक्याला हात लावतात, परंतु शास्त्रानुसार असे करू नये. यामुळे नकारात्मक प्रभाव वाढतो. चरणामृत नेहमी उजव्या हाताने घ्यावे आणि भक्तिभावाने व शांत चित्ताने घ्यावे. त्यामुळे चरणामृत अधिक लाभदायक ठरते.

Ram Mandir : प्राणप्रतिष्ठेवेळी राम गीतांनी दुमदुमला गाभारा, भक्तीमय वातावरणात विराजमान झाले प्रभू श्रीराम 

चरणामृत सेवनाचे फायदे :

1. शास्त्रात म्हटले आहे – अकालमृत्युहारम् सर्वव्याधिविनाशनम्. विष्णो पादोदकं पित्वा पुनर्जन्म न विद्याते ।

अर्थ : भगवान विष्णूच्या चरणांचे अमृतसमान जल सर्व प्रकारच्या पापांचा नाश करते. हे औषधासारखे आहे. जो व्यक्ती चरणामृत सेवन करतो त्याचा पुनर्जन्म होत नाही.

2. चरणामृत पाण्याचे सेवन केल्याने कधीही कॅन्सर किंवा इतर कोणताही आजार होणार नाही.

3. तुळशीची वनस्पती एक प्रतिजैविक औषध आहे. याचे सेवन केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, रोग दूर होतात आणि शरीरातील द्रवांचे संतुलन राखले जाते.

4. आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून चरणामृत हे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. आयुर्वेदानुसार तांब्यामध्ये चरणामृत सेवन केल्यानं अनेक रोग नष्ट होतात.

5. आयुर्वेदानुसार, चरणामृत हे मर्दानी शक्ती वाढवण्यासाठी देखील फायदेशीर मानले जाते.

6. चरणामृत सेवन केल्यानं पाणी मनाला शांती लाभते.

7. आरोग्याच्या फायद्यांसोबतच बुद्धीमत्ता आणि स्मरणशक्ती वाढवण्यातही चरणामृत प्रभावी आहे.

follow us