108 रुग्णवाहिकांची संख्या वाढली, सेवा आणखी जलद मिळणार : बोट अन् शिशू रुग्णवाहिकाही सेवेत

108 रुग्णवाहिकांची संख्या वाढली, सेवा आणखी जलद मिळणार : बोट अन् शिशू रुग्णवाहिकाही सेवेत

पुणे : राज्यातील नागरिकांसाठी 108 रुग्णवाहिका जीवनदायिनी ठरली आहे. ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट, बेसिक लाईफ सपोर्ट व बाईक ॲंब्युलन्स या प्रकारात ही सेवा पुरवली जाते. या सेवेत नवजात बालकांसाठी विशेष रुग्णवाहिका व बोट ॲंब्युलन्सचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. सद्यस्थितीत 108 सेवेद्वारे 937 रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात कार्यरत आहेत. मात्र, यापुढे 1756 रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात सेवा देणार आहे. रुग्णवाहिकेची संख्या वाढल्याने 108 क्रमांकावर कॉल केल्यानंतर रुग्ण वाहिकेचा प्रतिसाद देण्याची वेळ कमी होणार आहे. शिवाय जलदगतीने रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास मदत होणार आहे. (108 Ambulance will now provide even faster help.)

Ayodhya : तब्बल पाच शतकांचा वनवास संपला : प्रभू श्रीरामांची PM मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना

नवजात बालकांसाठी विशेष रुग्णवाहिका व बोट रुग्णवाहिकांचाही समावेश :

सध्या ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट, बेसिक लाईफ सपोर्ट आणि बाईक ॲंब्युलन्स या प्रकारात 108 रुग्णवाहिकेची सेवा पुरवली जाते. या सेवेत आता नवजात बालकांसाठी विशेष रुग्णवाहिका सेवेत दाखल झाल्या आहेत. सोबतच समुद्र आणि नद्यांमध्ये बुडून मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता, नव्याने 36 बोट रुग्णवाहिका विविध अपघाती समुद्र किनारे व नदी पात्रांमध्ये नव्याने तैनात होणार आहे.

शाशनावर येणार प्रतिमहिना 30 कोटींचा अतिरिक्त भार :

108 रुग्णवाहिकेसाठी सद्यस्थितीत प्रती महिना 33 कोटी रुपये शासनाला खर्च करावे लागत होते. रुग्णवाहिकेच्या वाढत्या संख्येमुळे प्रती महिना 63 कोटी रुपये शासनाला खर्च करावे लागणार आहे. एकंदरीतच अतिरिक्त 30 कोटी प्रतीमहिना शासनाला खर्च करावा लागणार आहे.

Ayodhya : ते खास 84 सेकंद…; प्राणप्रतिष्ठापनेसाठी 1.24 मिनिटांचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या वैशिष्ट्य

सद्यस्थितीत रुग्णवाहिकांची संख्या

ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट : 233
बेसिक लाईफ सपोर्ट : 704
बाईक ॲंब्युलंन्स : 33

नव्याने वाढणाऱ्या रुग्णवाहिकांची संख्या

ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट : 22
बेसिक लाईफ सपोर्ट : 570
बाईक ॲंब्युलंन्स : 163
नवजात शिशुंसाठी रुग्णवाहिका : 25
बोट ॲंब्युलन्स : 36

follow us
  • fb
  • instagram
  • youtube