Ayodhya : रेड कार्पेटवरून मोदींची ग्रँड एन्ट्री, हातात रामासाठी चांदीची छत्री; असा पार पडला अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा
Ayodhya Ram Mandir : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभू श्रीरामांची (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना महापूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. तब्बल पाच शतकांचा वनवास संपवून श्रीराम पुन्हा मंदिरात विराजमान झाल्याने संपूर्ण देशात भक्तीमय आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 5 जण गर्भगृहात उपस्थित होते.
जळगाव : काँग्रेसचे माजी खासदार कन्येसह भाजपच्या वाटेवर; रक्षा खडसेंना थांबविले जाणार?
या पुजेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान मोदी हे क्रीम कलरचा कुर्ता, पांढरं धोतर आणि गळ्यामध्ये पांढरा पंचा परिधान करून आले होते, तसेच त्यांनी प्रभू श्रीरामांसाठी चांदीचं छत्र ही खास भेट आणली होती. ही भेट पुजाऱ्यांकडे सुपूर्द केल्यानंतर पंतप्रधान प्राणप्रतिष्ठेच्या पूजेसाठी तयार झाले. यासाठी अगोदर त्यांना यजमान म्हणून कपाळावरती टिळक लावण्यात आला.
हृतिक-दीपिकाच्या ‘फाइटर’चा डंका; अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 2.84 कोटींची कमाई
त्यानंतर मोदी यांनी आचमन करून पूजेचा संकल्प सोडला. मुख्य पुजारांसह इतर सर्व पुजाऱ्यांच्या कडून मंत्रोच्चारांच्या घोषात प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झाला. यामध्ये अगोदर सर्व भगवान गणेशांची पूजा करून करण्यात आली. कोणत्याही पूजेला गणेश पूजनाने सुरवात करणे शास्त्रात महत्त्वाचे मानले जाते. त्यानंतर मंदीरात विराजमान असलेल्या श्रीरामांच्या मोठ्या मूर्तीसह जुन्या मूर्तीची देखील गाभाऱ्यामध्ये आणून विधिवत पूजा संपन्न झाली. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत हे देखील मोदी यांच्या शेजारीच बसलेले होते.
या पूजेदरम्यानच दुपारी बरोबर बारा वाजून 29 मिनिट आणि आठ सेकंद ही वेळ प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी महत्त्वाची होती कारण त्यावेळी अभिजीत मुहूर्त होता आणि हाच प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात साजला गेला. प्राणप्रतिष्ठा सूर्याची महापूजा संपन्न झाल्यानंतर पंतप्रधान मोदींसह सर्व मान्यवरांकडून प्रभू श्रीरामांचे चरणी पुष्प आणि अक्षता अर्पण करण्यात आल्या तसेच महापूजेनंतर प्रभू श्रीरामांची महाआरती पार पडली. त्यानंतर पुजाऱ्यांकडून पूजा संपन्न झाल्याचं जाहीर करण्यात आलं. तसेच रामरक्षेसह पुन्हा एकदा मंत्रोच्चारांचा जय घोष करण्यात आला.