Ram Mandir Inauguration : येत्या 22 जानेवारीला श्रीराम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Ram Mandir) होणार आहे. संपूर्ण देश या सोहळ्याची आतुरतेनं वाट पाहात आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर(Declared a public holiday) करण्यात आली आहे. पण दुसरीकडे आम्हाला अयोध्येमधील मंदिरात होणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापणेनिमित्त (Sri Ram Pranapratisthanapa)दिली जाणारी सुट्टी नको, आमचा अभ्यास बुडाला तर रामलल्ला खुश होणार नाही, असे म्हणत विद्यार्थिनींनी (Student) 22 जानेवारीची सुट्टी नाकारली आहे. विख्यात नृत्यांगणा (dancer)आणि स्मितालयाच्या अध्यक्ष झेलम परांजपे (Jhelum Paranjape)यांनी सोशल मीडियावर (Social media)पोस्ट शेअर करुन ही माहिती दिली आहे.
माजी टीकाकार मूग मिळून गप्प; अजितदादांचा जुना व्हिडिओ ट्वीट करत आव्हाडांची खोचक टीका
22 जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे. प्रत्येक मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमांमध्ये कर्मचाऱ्यांना, विद्यार्थ्यांना सहभागी होता यावं, हा सोहळा प्रत्येकाला आपल्या डोळ्यानं पाहता यावा, यासाठी केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
तर महाराष्ट्रात 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. पण झेलम परांजपे ज्या शाळेच्या अध्यक्ष आहेत, त्या शाळेनं मात्र ही सुट्टी नाकारली असल्याची सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही माहिती दिली आहे.
पत्रकारांची तक्रार, अजितदादांनी थेट आयुक्तानांच फटकारलं; काय होतं पोलिसांचं फर्मान?
झेलम परांजपे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, आम्ही सावित्रीच्या लेकी आणि आमचे बांधव जोतिबांची लेकरं… सरकारी GR शेवटच्या क्षणी येवो की खूप आधी येवो, आम्हाला राम प्राणप्रतिष्ठेची सुट्टी नको. रामलल्ला सुध्दा खूश नाही होणार, आमचा अभ्यास बुडला तर… आमच्या अध्यक्षा झेलम ताईंनी निर्णय घेतला आहे की शाळा चालू राहणार…
परांजपे यांनी शेअर केलेल्या पोस्टला नेटकऱ्यांनी देखील भरभरुन दाद दिलीय. नेटकऱ्यांनी अगदी चांगला निर्णय, योग्य निर्णय म्हटलंय तर काही नेटकऱ्यांनी कोणतीही सुट्टी न घेता 365 दिवस शालेय शिक्षणाचे कामकाज चालूच ठेवा ओ पुरोगामी. शाळेतून एक पण बेवडा, गुटखा खाऊ, मावा पटू, व्याभिचारी निर्माण झाला तर शिक्षकांनी एक रुपया ही पगार घेऊ नये, अशी खोचक टिकाही काही नेटकऱ्यांनी केला आहे.