स्टार प्लस आणि ‘तारा’ने मिळून “परदेसिया” या सुप्रसिद्ध गाण्याला दिला नवा ट्विस्ट!

2025 मधील सुपरहिट चार्टबस्टर "परदेसिया" हे गाणं या मालिकेतून पुन्हा एकदा नव्या रूपात सादर करण्यात आलं आहे.

Untitled Design (3)

Untitled Design (3)

A new twist to the famous song “Pardesiya”! : स्टार प्लस कायम वैविध्यपूर्ण कलाकृती मधून प्रेक्षकांची मन जिंकून घेत असताना नुकताच स्टार प्लसने तारा मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आणि रसिक प्रेक्षकांनी त्याला देखील भरभरून प्रेम दिलं. स्टार प्लस कायम नव्या शोसह टेलिव्हिजनवरील रोमॅन्सला नवी उंची देण्यासाठी ओळखलं जातं अशातच नुकताच प्रदर्शित झालेला त्यांचा तारा हा शो देखील पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांच्या मनाची पकड घेत आहे. आता निर्मात्यांनी युनिव्हर्सल म्युझिकसोबत सहकार्य करत प्रेक्षकांसाठी खास संगीतमय भेट आणली आहे. 2025 मधील सुपरहिट चार्टबस्टर “परदेसिया” हे गाणं या मालिकेतून पुन्हा एकदा नव्या रूपात सादर करण्यात आलं आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं मूळ गाणं प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं मात्र तारामधील या गाण्याचा नवा अंदाज या गाण्याला पुन्हा एकदा नव्या उंचीवर घेऊन जाईल यात शंका नाही. मालिकेत सादर करण्यात आलेल्या या गाण्याचा नव्या व्हर्जनमध्ये युवराज आणि तारा ही मुख्य पात्रं दिसतात. क्रुशाल आहुजा आणि कनिका कपूर यांनी या मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

जयपूरसारख्या शहरातील स्वप्नवत लोकेशन्स आणि निसर्गरम्य पार्श्वभूमीत चित्रित झालेल्या या व्हिडिओमध्ये क्रुशाल आणि कनिका रोमँटिक बाइक राईडचा आनंद घेताना दिसतात आणि बॅकग्राऊंडला हे सुमधुर गाणं ऐकू येतं. मालिकेतील त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीची जादू दोघांच्या भूमिकांना सहज आकर्षण बनवत असून प्रत्येक फ्रेम अजून खास आणि मनमोहक दिसते. दोघांच्या नजरांची देवाणघेवाण गोड स्मित आणि खेळकर क्षण या सगळ्यांतून एक ताजं आणि नजरा हटू न देणारं रोमँटिक वातावरण निर्माण होतं.

लव्ह जिहादवर नियंत्रणासाठी राज्य सरकारचा कायदा, 7 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद असलेले विधेयक सादर

या गाण्याचं चित्रण अतिशय सुंदर पद्धतीने करण्यात आलं असून संपूर्ण म्युझिक व्हिडिओला सिनेमॅटिक आणि स्वप्नवत अशी झळाळी मिळते. जी गाण्याच्या भावनांना अगदी योग्यरीत्या साथ देते. परदेसिया हे गाणं आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं मात्र युवराज आणि तारा यांच्या जोडीने त्यात नव्या उत्साहाची भर घातली आहे ज्यामुळे हे गाणं जणू पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांची मन जिंकून घेणार आहे. हे गाणं डिजिटल प्रदर्शित झाल्यापासून या गाण्याभोवतीचा उत्साह आणि उत्सुकता अजून वाढली असून अनेक प्रेक्षक या जोडीला टेलिव्हिजनवरील सर्वात आशादायी नव्या ऑन-स्क्रीन जोड्यांपैकी एक मानू लागले आहेत.

स्टार प्लससाठीही ही संगीतमय पुनर्रचना एक वेगळा आणि उत्साहवर्धक सर्जनशील टप्पा ठरला आहे कारण यातून प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन आणि वेगळं सादर करण्यात आलं आहे. तारा या पात्रांच्या माध्यमातून परदेसिया गाण्याची नव्याने मांडणी केल्यामुळे कथेला एक वेगळीच रंगत मिळते. युवराज आणि तारा यांच्या जादुई जोडीने हे सुप्रसिद्ध गाणं पुन्हा नव्या ट्विस्ट ने प्रेक्षकांच्या भेटीला आल्यामुळे नव्या हे गाणं पुन्हा एकदा ट्रेंड मध्ये येईल यात शंका नाही.

‘तारा’ ही मालिका पाहायला विसरू नका दररोज संध्याकाळी ७:३० वाजता फक्त स्टार प्लसवर !

Exit mobile version