आमिर खानचे तिसरे लग्न म्हणजे लव्ह जिहादच; हिंदू कधीही खपवून घेणार नाही – संग्राम जगताप

Sangram Jagtap On Aamir Khan : कधी चित्रपटामुळे तर कधी आपल्या सामाजिक कामामुळे सोशल मीडियावर चर्चेत राहणारा अभिनेता आमिर खानने

Sangram Jagtap On Aamir Khan

Sangram Jagtap On Aamir Khan

Sangram Jagtap On Aamir Khan : कधी चित्रपटामुळे तर कधी आपल्या सामाजिक कामामुळे सोशल मीडियावर चर्चेत राहणारा अभिनेता आमिर खानने नुकतंच तिसऱ्यांदा लग्न केल्याने तो पुन्हा एकदा सोशल मीडियासह राज्याचे राजकारणात चर्चेत आहे. आमिर खानच्या तिसऱ्या लग्नामुळे त्याच्यावर महायुतीमधील नेते जोरदार टीका करताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असणारे नितेश राणे यांनी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला जव्ह जिहादचा प्रकार दाखवत हिंदू तरुणांना त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर टीका करत त्याच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमिर खानचे तिसरे लग्न म्हणजे लव्ह जिहादचाच प्रकार आहे. हिंदू समाज हे कधीही खपवून घेणार नाही असं त्यांनी म्हटले आहे.

माध्यमांशी बोलताना आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) म्हणाले की, आमिर खानचे (Aamir Khan) तिसरे लग्न म्हणजे लव्ह जिहादचाच प्रकार आहे. जरी त्याने आपल्या पत्नींचे धर्मांतर केले नसले तरी, तीन – तीन लग्न करुनही काही होत नाही, हा त्याच्या समाजासाठी प्रेरणा देण्याचा प्रयत्न आहे. त्याच्या पत्नीपासून झालेल्या मुलांना कोणत्या जातीचे किंवा धर्माचे नाव दिले जाते? आमिर खानने अनेक सामाजिक कामे केली याचा अर्थ त्याला काहीही करण्याची मुभा आहे असा गैरसमज त्याने काढुन टाकावा , हिंदू समाज हे कधीही खपवून घेणार नाही असं आमदार जगताप म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते मंत्री नितेश राणे ?

अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, आमिर खान हा लव जिहादचा (Love Jihad) ब्रँड अ‍ॅम्बेडेसर आहे. हिंदू समाजातील तरुणांनी त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार घालावा.

Kia Carens EV वर चक्क 2 लाखांची सवलत; भन्नाट रेंज अन् फीचर्ससह येणारी 7-सीटर कार खरेदीची सुवर्णसंधी

5 जुलै रोजी तिसऱ्यांदा लग्न

तर अभिनेता आमिर खानने 5 जुलै 2026 रोजी प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत विवाह केला. आमिरने पाली हिल येथील घरात लग्न केले. माहितीनुसार, आमिर गेल्या काही दिवसांपासून गौरीला डेट करत होता. त्यांचे एकत्र फिरतानाचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Exit mobile version