Kia Carens EV वर चक्क 2 लाखांची सवलत; भन्नाट रेंज अन् फीचर्ससह येणारी 7-सीटर कार खरेदीची सुवर्णसंधी
Kia Carens EV : देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये देखील वाढ करण्यात आल्याने अनेकांचे बजेट बिघडले आहे.
Kia Carens EV : देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये देखील वाढ करण्यात आल्याने अनेकांचे बजेट बिघडले आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होत असल्याने आता भारतीय कार बाजारात देखील पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांऐवजी इलेक्ट्रिक गाड्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. जर तुम्ही देखील पुढील काही दिवसात इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याची तयारी करत असाल तर बाजारात कमी वेळेत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी कंपनी ‘किया’ ने एक भारी ऑफर जाहीर केलं आहे. ज्याचा फायदा घेत तुम्ही अगदी कमी किंमतीमध्ये 4 सीटर इलेक्ट्रिक कार Kia Carens Clavis EV खेरदी करु शकतात. कंपनी या कारवर 2 लाख रुपयांपर्यंतची सवलत देत आहे.
2 लाख रुपयांपर्यंतची सवलत
माहितीनुसार, जुलै महिन्यात या कारवर ग्राहकांना रोख सवलत (Cash Discount), एक्सचेंज ऑफर्स, लॉयल्टी ऑफर्स आणि स्क्रॅपेज बोनस यांसारखे फायदे मिळणार आहे. कारच्या निर्मिती वर्षावर (Manufacturing Year) आधारित, तुम्ही 2 लाख रुपयांपर्यंतची बचत करू शकता. या ऑफर्स शहर आणि उपलब्ध स्टॉकनुसार बदलू शकतात. त्यामुळे, अचूक किंमत आणि सवलतींच्या तपशीलांसाठी तुमच्या जवळच्या Kia शोरूमशी संपर्क साधा.
Kia Carens Clavis EV ऑफर्स
‘AutoPunditz‘ च्या अहवालानुसार कंपनी Kia Carens Clavis EV च्या MY26 मॉडेलवर 95,000 रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे. यामध्ये 20,000 रुपयांची रोख सवलत, 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 20,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस, 20,000 रुपयांचा स्क्रॅपेज बोनस आणि 15,000 रुपयांची कॉर्पोरेट ऑफर यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे Carens Clavis EV चे मागील वर्षाचे स्टॉक (जुने मॉडेल) निवडले, तर तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. हे मॉडेल खरेदी केल्यास तुम्ही 2 लाख रुपयांपर्यंतची बचत करू शकता. यात 85,000 ची रोख सवलत (कॅश डिस्काउंट), 75,000 ची एक्सचेंज ऑफर, 20,000 ची लॉयल्टी ऑफर आणि 20,000 चा स्क्रॅपेज बोनस यांचा समावेश आहे.
पहिला एकदिवसीय सामना, भारताची प्रथम गोलंदाजी; ‘या’ खेळाडूला संघात संधी-
‘कॅरेन्स क्लेव्हिस ईव्ही’ फीचर्स
कियाची ही इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात भन्नाट फीचर्ससह उपलब्ध आहे. या कारमध्ये 42 kWh आणि 51.4 kWh अशा दोन बॅटरी देण्यात आले आहे. यात 6-सीटर आणि 7-सीटर असे पर्याय मिळतात आणि एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही कार 490 किलोमीटरची रेंज देते. इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील आणि अलॉय व्हील्स सारख्या फीचर्स या कारमध्ये असून भारतीय बाजारात या कारची एक्स शोरुम किंमत 18 लाख ते 25 लाख दरम्यान आहे.