Kia Carens Clavis EV लॉन्च 7 सीटर अन् रेंज तब्बल 490 किमी; किंमत फक्त 18 लाख, जाणून घ्या फीचर्स

Kia Carens Clavis EV लॉन्च 7 सीटर अन् रेंज तब्बल 490 किमी; किंमत फक्त 18 लाख, जाणून घ्या फीचर्स

Kia Carens Clavis EV : भारतीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक कार्सची (Electric Cars) मागणी झपाट्याने वाढली आहे. या मागणीमुळे बाजारात आता दमदार आणि भन्नाट फीचर्ससह नवीन नवीन इलेक्ट्रिक कार्स लॉन्च होत आहे. जर तुम्ही देखील कमी बजेटमध्ये एक दमदार इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर भारतीय बाजारात आता एक अगदी कमी किंमतीमध्ये भन्नाट फीचर्ससह 7 सीटर इलेक्ट्रिक कार लॉन्च झाली आहे.

किआने भारतीय बाजारात परवडणाऱ्या किंमतीमध्ये नवीन 7 सीटर कार लॉन्च केली आहे.  किआने बाजारात धुमाकूळ घालणारी किआ कॅरेन्स क्लॅविस आता इलेक्ट्रिक (Kia Carens Clavis EV) व्हर्जनमध्ये लॉन्च केली आहे. किआ कॅरेन्स क्लॅविस इलेक्ट्रिक ही भारतात विकली जाणारी सर्वात स्वस्त तीन-रो इलेक्ट्रिक कार आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 17.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 24.49 लाख रुपयांपर्यंत जाते. या कारची बुकिंग 22 जुलै 2025 पासून सुरु होणार आहे. इलेक्ट्रिक किआ कॅरेन्समध्ये काही बदल देखील ग्राहकांना पाहायला मिळणार आहे. या कारच्या संपूर्ण फ्रंट प्रोफाइलमध्ये एलईडी डीआरएल लावण्यात आले आहे. तर नवीन 17-इंच एरो अलॉय व्हील्स आहेत ज्यामुळे या कारला एक दमदार लूक येत आहे.

Kia Carens Clavis EV फीचर्स

किआ कॅरेन्स क्लॅविस इलेक्ट्रिकमध्ये कंपनीकडून एकापेक्षा एक दमदार फीचर्स देण्यात आले आहे. या कारमध्ये तुम्हाला डिजिटल कन्सोल आणि इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी दोन स्क्रीनसह 26.6-इंचाचा पॅनोरॅमिक डिस्प्ले देखील पाहायला मिळणार आहे. याचबरोबर या कारमध्ये 90 हून अधिक कनेक्टेड फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच लेव्हल 2 ADAS, वायरलेस चार्जिंग, पॅनोरॅमिक सनरूफ, ॲम्बियंट लाइटिंग, वन-टच टंबल-डाउन सेकंड रो सीट, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, एअर प्युरिफायर सारखी मस्त फीचर्स या कारमध्ये असणार आहे.

रोमांचक सामना, इंग्लंडचा विजय पण चर्चा सौरव गांगुलीची…, लॉर्ड्स कसोटीत नेमकं घडलं तरी काय?

Kia Carens Clavis EV रेंज  

या कारमध्ये सिंगल मोटर सेटअप आहे जो 169 bhp पॉवर आणि 255 nm टॉर्क निर्माण करतो. ही कार 8.4 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग वाढवते. यात 51.4 किलोवॅटची बॅटरी पॅक आहे जो एका चार्जवर 490 किमीची रेंज देतो. याशिवाय, 42 किलोवॅट बॅटरी पॅक देखील उपलब्ध आहे जो 404 किमीची रेंज देतो. ही कार 7.4 किलोवॅट आणि 11 किलोवॅट क्षमतेच्या एसी चार्जर्सना सपोर्ट करते. कंपनी या इलेक्ट्रिक कारवर 8 वर्षे किंवा 1,60,000 किमीची वॉरंटी देत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या