Abhijit Sawant : बिग बॉस, इंडियन आयडॉल ते अगदी संगीत विश्वात सगळ्यांची मन जिंकळणारा गायक अभिजीत सावंत पुन्हा एकदा चर्चेत आला तो म्हणजे त्याचा नवरात्री स्पेशल गाण्यामुळे नुकतंच अभिजीत ने संगीतबद्ध आणि जादू आवाजात गायलेल प्रेमरंग सनेडो गे गाणं रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आल पण आता हे गाणं सगळीकडे ट्रेंड होताना दिसतंय. फक्त सोशल मीडिया वर नव्हे तर अगदी रास दांडियाच्या कार्यक्रमात हे गाणं ट्रेंडिंग ठरतंय.
अभिजीत म्हणतो “आपल्याकडे नवरात्री आणि रास दांडियासाठी अनेक फेमस गाणी आहे आणि आता हे गाणं देखील ट्रेंड होतंय हे बघून खूप आनंद होतोय. अगदी लहानमोठ्या फॅन्स ने यावर खूप कमाल रील बनवले आहेत आणि यातून त्यांचं प्रेम मिळतंय याहून मोठी गोष्ट काय असावी.
प्रेमरंग सनेडो (Premrang Sanedo) हे यंदाच्या रास दांडिया मध्ये ट्रेंडिंग ठरलं आणि अनेक चाहते या गाण्याला गरबा अँथम बोलायला लागले आहे. माझ्या कामाची ही पोच पावती आहे असं मला वाटतं. पहिलं गुजराती गाणं असलं तरी त्याला एक मराठी टच आहे आहे हेच या गाण्यातून प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न केला होता आज तो यशस्वी होतोय.
प्रेम रंग सनेडो हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल्यापासून मराठी सोबत गुजराती प्रेक्षकांनी त्याला प्रेम दिलं आहे. अभिजीत सावंत ने आजवर अनेक दर्जेदार गाणी गायली आहे आणि त्याचा गाण्याची जादू ही कायम बघायला मिळते.
20 वर्ष संगीत विश्वात वैविध्यपूर्ण शैलीने त्याने गाण्याचा हा प्रवास असाच सुरू ठेवला आहे. प्रेमरंग सनेडो हे गाणं गुजराती आणि मराठी गाण्याचं मिक्सटेप असलं तरी त्याचा फॅन्सने या गाण्यावर अगणित रील्स देखील सोशल मीडिया वर शेयर केल्या आहेत.
आशिया कप 2025: भारतासोबत फायनलमध्ये कोण भिडणार? आज होणार निर्णय
अभिजीत ने पहिल्यांदा गुजराती गाण्याचा हा प्रयोग यातून केला असला तरी रसिक प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिला आहे. येणाऱ्या काळात अभिजीत अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स आणि त्यातून वैविध्यपूर्ण गाण्याची निर्मिती करणार असल्याचं कळतंय. सध्या ट्रेंडीग गाणी आणि अभिजीत सावंत हे समीकरण पक्क ठरतंय यात शंका नाही.