Akshaya Naik : वारीत अविरत चालणारी मंडळी आणि विठ्ठल माऊलीचे सेवाकरी आणि त्यांचा सोबतीने कधीतरी आपण सुद्धा वारी करावी अस मनात असलेली एक इच्छा आणि यंदाच्या वारीत अभिनेत्री अक्षया नाईक ची हीच इच्छापूर्ती माउलीच्या आशीर्वादाने पूर्ण झाली. अक्षया ने तिच्या पहिल्या वहिल्या वारीचा अनुभव शेयर केला असून अक्षया सांगते.
“वारीबद्दल कायम मनात एक उत्सुकता होती कधीतरी आपण सुद्धा असंच बाकी वारकरी मंडळीसोबत वारी अनुभवू शकू का? हा प्रश्न कायम मनात होता आणि यंदा अचानक का होईना पण पांडुरंगाचं बोलवणं हे आल आणि मी माझ्या आयुष्यातली पहिली वहिली वारी अनुभवली. वारीत चालणारी मंडळी बघून त्यांचा मध्ये एवढी ऊर्जा कशी येत असावी हे वारीत जाऊन अनुभवता आल हा समृद्ध संपन्न अनुभव शब्दांत मांडूच शकत नाही कारण अस म्हणतात वारी ही अनुभवावी लागते आणि हा प्रत्यय वारी करून आला.
Dhamaal 4 ची ब्लॉकबस्टर घोडदौड सुरूच; 150 कोटींच्या दिशेने वाटचाल!
टाळ मृदुगांचा गजर, हरिनामाचा जप आणि वारी मधला उत्साह हा शब्दाच्या पलीकडचा आहे. वारीत जाऊन मला विठ्ठल रुखमिणी रूपी आलेल्या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी देखील मिळाली आणि माझी वारी सुफळ संपूर्ण झाली” अनेक कलाकार मंडळी सध्या वारीला जातान बघायला मिळतात प्रत्येकाच्या नशिबी आलेली वारी ही सारखी नसली तरी ती वेगळा पण अद्भुत अनुभव देणारी मात्र नक्कीच आहे यात शंका नाही.
… तर भाजपच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही; जंतरमंतरवरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
