Amruta Khanvilkar: अभिनय आणि नृत्य यातून कायम प्रेक्षकांची मन जिंकणारी अष्टपैलू अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आता ‘वर्ल्ड ऑफ स्त्री’ (World of Stree) या नृत्य संगीतात तिच्या भव्य नाट्यपदार्पणासह एक नवीन प्रवास सुरू केला आहे. थेट प्रेक्षकांसमोर सादरीकरण करण्याचे (Social media) तिचे दीर्घकाळचे स्वप्न पूर्ण या निमित्ताने पूर्ण होतंय. अमृताच्या आगामी ‘वर्ल्ड ऑफ स्त्री’ मधून शास्त्रीय आणि अर्ध-शास्त्रीय संगीत आणि नृत्याची अनोखी मैफिल यातून अनुभवयाला मिळणार आहे यात शंका नाही.
‘वर्ल्ड ऑफ स्त्री‘ मध्ये अमृता सोबत डान्स गुरु आशिष पाटील आणि 10 अफलातून नर्तकांची प्रतिभावान टीम आहे. 90 मिनिटांचा लाइव्ह ऑडिओ-व्हिज्युअल परफॉर्मन्स भक्ती (भक्ती), सौंदर्य (श्रृंगार) आणि डायनॅमिक एनर्जी (शिवशक्ती) च्या थीम्स नुसार असणार असून तो नक्कीच मंत्रमुग्ध करणारा असणार आहे. अमृता एक अभिनेत्री म्हणून सगळ्यांना माहीत आहे पण तिच्या नृत्य अविष्कराची अनोखी बाजू वर्ल्ड ऑफ स्त्री मधून अनुभवयाला मिळणार आहे.
अमृताने याआधी एक कमालीचं पोस्टर तिच्या सोशल मीडिया वरून शेअर केलं होत आणि आता अमृताने ‘वर्ल्ड ऑफ स्त्री ‘चा टीझर लाँच केला आहे. तिने या टीझर मधून या कार्यक्रमाची एक सुंदर झलक प्रेक्षकांना दिली असून आता प्रेक्षक या साठी उत्सुक आहेत. ‘वर्ल्ड ऑफ स्त्री ‘ बद्दल अमृता म्हणते “नृत्य हा कायमचं माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. वर्ल्ड ऑफ स्त्री च्या निमित्तानं नाट्य नृत्य आणि संगीत यांची अनोखी सांगड घालून ही एक मैफिल प्रेक्षकांना देणं हे माझ्यासाठी स्वप्न होत आणि ते पूर्ण होतंय. आशिष पाटील अर्थ एनजीओ यांच्यासोबत सहकार्य करून आणि कथ्थक नर्तकांची एक अत्यंत कुशल टीम सोबत घेऊन हा नवा प्रवास सुरू करणं माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे.
रेड गाऊनमध्ये Amruta Khanvilkar च्या अदा; पाहा चाहत्यांना घायाळ करणारे फोटो
जानेवारीपासून “वर्ल्ड ऑफ स्त्री ” साठी काम करून आज हे स्वप्न तुमच्या सोबत शेयर करतोय तुमचं प्रेम आणि पाठिंबा कायम असाच सोबत राहू द्या. मी अशा शोची कल्पना केली आहे जो केवळ शास्त्रीय नृत्य प्रकारच साजरे करत नाही तर आपल्या सांस्कृतिक वारशाचाही शोध घेत आहे. लाइव्ह परफॉर्म करण्याबद्दल तिची उत्सुकता व्यक्त करताना अमृताने म्हणते, ‘मी कायम प्रेक्षकांना काय हवंय हे देण्याचा प्रयत्न केला आहे. संगीत आणि नृत्य कार्यक्रमांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे वर्ल्ड ऑफ स्त्री रंगमंचावर घेऊन येण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.
कमालीचे व्हिज्युअल, भावपूर्ण संगीत आणि मनमोहक नृत्य सादरीकरणासह प्रेक्षकांचे मनोरंजन करणे आणि त्यांना मंत्रमुग्ध करणे हेच आमचं ध्येय आहे. अर्थ एनजीओ आणि आशिष पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने अमृतकला स्टुडिओज निर्मित ‘वर्ल्ड ऑफ स्त्री नक्कीच प्रेक्षकांना मोहित करणार आहे. 24 ऑगस्ट 2024 रोजी वर्ल्ड ऑफ स्त्री चा प्रीमियर होणार असून प्रेक्षकांना नृत्य, संगीत आणि संस्कृतीच्या अनोख्या उत्सवात मग्न होण्यासाठी आम्ही सगळेच आमंत्रित करत आहोत.अमृता खानविलकरच “वर्ल्ड ऑफ स्त्री” मधल नेत्रदीपक नाट्यपदार्पण पाहण्याची संधी गमावू नका. अभिनेत्री अमृता खानविलकरने कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारून तिच्या फॅशन स्टेटमेंटने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे.