Download App

Kangana Ranaut: कंगना झाली आत्या! बाळाला जवळ घेत म्हणाली, ‘आमच्या कुटुंबाला…’

Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ही बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. नेहमीच तिच्या दमदार अभिनयामुळे आणि बेधडक स्वभावामुळे चर्चेत असते. बॉलिवूडमधील (Bollywood) आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. गेली अनेक वर्ष तिने विविध पठडीतल्या भूमिका साकारल्या. तर आता ती दिग्दर्शन व निर्मिती क्षेत्रातही उतरली. सध्या कंगनाच्या घरी छोट्या पाहुण्यांचे आगमन झालं आहे. तिचा भाऊ अक्षत रणौतला मुलगा झाला. यानिमित्त कंगनाने संपूर्ण कुटुंबासोबत आणि बाळासोबतचे छान क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


सध्या तिच्या आईच्या चेहऱ्यावर आजीचा झाल्याचा मोठा आनंद झाल्याचे बघायला मिळत आहे. तर कंगना आणि रंगोली या दोघींना देखील आत्या झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेना असा झाला आहे. दरम्यान कंगनाने आपल्या भाच्याचं ठेवलेलं नाव ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

कंगनाने बाळासोबतचे एक फोटो शेअर करत सांगितले आहे की, ‘आजच्या शुभदिनी आमच्या कुटुंबामध्ये छोट्या पाहुण्यांचे आगमन झालं आहे. माझा भाऊ अक्षत रणौत आणि त्याची पत्नी रितू यांनी गोंडस अशा मुलाला जन्म दिला. या तेजस्वी आणि मनमोहक मुलाचं नाव आम्ही ‘अश्वत्थामा रणौत’ ठेवलं आहे. आमच्या कुटुंबातील या नवीन पाहुण्याला तुम्हीही आशिर्वाद द्या. आमचा आनंद आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. आम्ही तुमचे आभारी आहोत, अशी पोस्ट तिने यावेळी केली आहे.

Rajkummar Rao: राजकुमार रावला ‘गन्स अँड रोझेस’ मधील दमदार अभिनयासाठी पॉप्युलर चॉईस अवॉर्ड

कंगनाच्या या पोस्टला चाहते भरभरून प्रेम देत आहेत. परंतु काही चाहत्यांना तिने ठेवलेल्या बाळाचं नाव आवडले नसल्याचे दिसत आहे. महाभारतामध्ये अश्वत्थामाला श्रीकृष्णाने शाप दिला होता. आपण हे नाव ठेवत नाही अशी कमेंट तिला एका चाहत्याने केली आहे. कंगना तिच्या आगामी तेजस’ सिनेमा प्रदर्शित होतोय. यामध्ये तिने पायलटची भूमिका साकारताना बघायला मिळणार आहे.तसेच तिचा दुसरा आणखी एक ‘इमर्जन्सी’ हा सिनेमा देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us