Actress Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये खासगी आयुष्यावर प्रतिक्रिया दिली होती. तिने एकदा तिच्या आईला प्रश्न विचारला होता ‘आई तुला हा जावई चालेल का?’ त्यानंतर चर्चांना उधाण आले. (Mali) त्या अभिनेत्याने देखील या चर्चांनवर प्रतिक्रिया दिली होती. मराठी सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी. तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. तिची ‘जुळून येती रेशीम गाठी‘ हा मालिका हिट ठरली होती. त्यानंतर प्राजक्ताने कधीही मागे वळून पाहिलं नाही. सध्या एका वेगळ्या कारणामुळे प्राजक्ता चर्चेत आहे.
प्राजक्ता 36 वर्षांची झाली. तरीही ती आज सिंगल आहे. तिने लग्न केलेले नाही. तिच्या लग्नाविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर असतात. प्राजक्ताने एका मुलाखतीमध्ये तिच्या खासगी आयुष्यावर वक्तव्य केले होते. तिने एका अभिनेत्याचे नाव घेत क्रश असल्याचे सांगितले होते. तसेच त्यावर त्या अभिनेत्याने प्रतिक्रिया देखील दिली होती.
चित्रपटसृष्टीत शोककळा; चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका साकारणारे अभिनेते अच्युत पोतदार यांचं निधन
प्राजक्ता माळीचे अभिनेता वैभव तत्ववादीवर क्रश होते. तिने एका मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितलं होतं. इतकच नाही तर तिने गंमतीने तिच्या आईलाही विचारलं होतं की ‘आई, हा जावई म्हणून चालेल का?’ त्यानंतर सर्वत्र प्राजक्ता माळीच्या लग्नाची चर्चा सुरु होती. प्राजक्ता माळी वैभव तत्ववादीशी लग्न करणार असे म्हटले जात होते. पण वैभवने यावर प्रतिक्रिया देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
प्राजक्ताच्या तोंडून वैभव तत्ववादीचे नाव ऐकून सर्वजण चकीत झाले होते. त्यानंतर वैभवला एका मुलाखतीमध्ये याबाबत विचारण्यात आले होते की, ‘प्राजक्ताने असं म्हटलं होतं की, तिच्या आईने तुम्हाला लग्नासाठी विचारलं होतं. हे खरं आहे का?’ वैभवने त्यावर दिलेल्या उत्तराने सर्वांना चकीत केले होते. “मला वाटतं, तुम्ही तो व्हिडीओ नीट पाहिला नाही.
त्या व्हिडीओमध्ये ती म्हणाली होती की, ‘कॉफी आणि बरंच काही’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर मी आईला म्हटलेलं की, ‘आई तुला हा जावई चालेल का?’ वैभवने त्यावर दिलेल्या उत्तराने सर्वांना चकीत केले होते. “मला वाटतं, तुम्ही तो व्हिडीओ नीट पाहिला नाही. त्या व्हिडीओमध्ये ती म्हणाली होती की, ‘कॉफी आणि बरंच काही’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर मी आईला म्हटलेलं की, ‘आई तुला हा जावई चालेल का?’”