Download App

Adipurush ने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच मारली बाजी; दोन दिवसांतच केली बक्कळ कमाई!

Adipurush Advance Booking : अभिनेता प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा येत्या 16 जूनला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. रिलीज होण्याअगोदरच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता चांगलीच सुरुवात झाली आहे. (Adipurush record break collection in two days from Advance Booking)

Supriya Sule : ट्विटरला धमकी देणं हे धक्कादायक, देशातील लोकशाहीला धोका; टीका करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी

‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा हिंदीमध्ये 4 हजारपेक्षा जास्त स्क्रिन्सवर प्रदर्शित होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. देशभरात हा सिनेमा 6 हजार दोनशे स्क्रिन्सवर रिलीज होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. रविवारी (10 जून 2023) पासून या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. गुरूवारी 14 जूनपर्यंत हे अॅडव्हान्स बुकिंग चालणार आहे.

Delhi Univrsity : हिंदुत्वाचा होणार इन डेप्थ अभ्यास; दिल्ली विद्यापीठाचा मोठा निर्णय, यावर्षीपासूनच अंमलबजावणी

यादरम्यान आज या बुकींगच्या दुसऱ्याच दिवशी या चित्रपटाने बाजी मारली आहे. दोन दिवसांत आदिपुरूषच्या तब्बल 39 हजार तिकीटांची अॅडव्हान्स बुकिंग झाली आहे. त्यात 12 जूनच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये 18500 तिकीटं पीव्हीआरने, 12500 आयनॉक्सने तर उर्वरित 8000 तिकीटं ही सिनेपॉलिसने विकली आहेत.

त्यामुळे आता द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files), पठाण (Pathaan), द केरळ स्टोरी (The Kerala Story), आणि ‘जरा हटके जरा बचके’ (Zara Hatke Zara Bachke) या सिनेमांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मोठी कमाई झाली आहे. आता या यादीमध्ये ‘आदिपुरुष’ सिनेमाचा देखील समावेश होणार असल्याची चर्चा होत आहे.

‘आदिपुरुष’ या सिनेमामध्ये प्रभास रामाच्या तर कृती सेनन सीता मातेच्या भूमिकेत आहे. तसेच सैफ अली खान रावणाच्या भूमिकेमध्ये चाहत्यांना दिसून येणार आहे. लक्ष्मणाच्या भूमिकेत सनी सिंह आणि हनुमानच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे दिसणार आहे. ‘रामायणा’वर आधारित असलेला हा सिनेमा १६ जून २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ‘आदिपुरुष’ सिनेमाला सेन्सॉर बोर्डाचं यू सर्टिफिकेट मिळाले आहे. ‘आदिपुरुष’चं पोस्टर, ट्रेलर आणि गाणी पसंतीस उतरल्याने चाहते आता सिनेमाची प्रतीक्षा करत असल्याचे दिसून येत आहे.

ओम राऊत दिग्दर्शित या सिनेमाची कथा रामायणावर आधारित असली तरी नव्या अंदाजात ती चाहत्यांच्या समोर मांडण्यात येत आहे. यामध्ये अभिनेता प्रभासने राघव, क्रिती सनॉने जानकी, सैफ अली खानने लंकेश, सनी सिंगने शेष आणि देवदत्त नागेनं बजरंगची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचा दुसरा ट्रेलर तिरुपतीमधील भव्य कार्यक्रमात लाँच करण्यात आला आहे.

आदिपुरुष हा सिनेमा आधी ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र नंतर ही तारीख १२ जानेवारी २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आली. या चित्रपटाच्या टीझरवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर काही बदल करण्यासाठी निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती. अखेर येत्या १६ जून रोजी 3D मध्ये हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Tags

follow us