Ankita Lokhande will be in another Biopic : स्वातंत्र्य वीर सावरकर ( Swatantra Veer Savarkar ) या चरित्र चित्रपटानंतर अभिनेत्री अंकीता लोखंडे ( Ankita Lokhande ) आणखी एका चरित्रपर वेब सिरीजमध्ये ( Web Series ) दिसणार आहे. चित्रपट निर्माते संदीप सिंग हे प्राचीन भारतातील वैशाली प्रजासत्ताकातील शाही नृत्यांगना आम्रपालीच्या जीवनाचा इतिहास मांडण्यासाठी सज्ज आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडेला या सीरिजमध्ये प्रमुख आम्रपाली प्रसिद्ध आणि ग्लॅमरस नगरवधूची भूमिका साकारण्यासाठी सामील करण्यात आले आहे.
‘चमकिला’ स्टार कास्ट कपिलच्या शोमध्ये लावणार हजेरी, अभिनेत्रीने शेअर केली ‘ती’ पोस्ट
यामध्ये आम्रपालीचा शाही गणिका होण्यापासून ते बौद्ध नन बनण्यापर्यंतचा तिचा प्रवास यातून उलगडणार आहे. आम्रपालीने अनुभवलेल्या भावना आणि सुखसोयींचा केलेला त्याग , एक बौद्ध भक्त म्हणून ब्रह्मचर्य स्वीकारून तिच्या या प्रवासाची गोष्ट यात दिसणार आहे. ‘आम्रपाली’ हा चित्रपट संदीप सिंग प्रस्तुत करत असून लीजंड स्टुडिओज निर्मित आहे.
Ajit Pawar : आता साहेबांच्या सुनेला निवडून द्या; सुनेत्रा पवारांसाठी अजितदादांचं बारामतीकरांना आवाहन
चित्रपट निर्माते संदीप सिंग म्हणाले, “आम्रपाली तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जात होती आणि ती भारताच्या इतिहासातील सर्वात मजबूत पात्रांपैकी एक होती. मी या भूमिकेसाठी अंकिता लोखंडेशिवाय कोणालाच पाहू शकलो नाही. जिने ‘स्वातंत्र्य वीर’ चित्रपटात तिच्या नेत्रदीपक अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या भूमिकेसाठी ती अगदी योग्य आहे कारण तिच्याकडे एक मोहक राजकुमारी आणि नागरवधूचे सर्व गुणधर्म आहेत, कारण ती एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. अंकिता तिच्या डोळ्यांतून सुंदर भावना व्यक्त करते जे आम्रपालीचे सगळं सार टिपेल ”
सांगलीवरुन आघाडीत बिघाडी? विशाल पाटील अन् विश्वजित कदम ‘नॉट रिचेबल’…
या सहकार्याविषयी बोलताना अंकिता लोखंडे म्हणाली, “माझ्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटात यमुनाबाईची भूमिका केल्याबद्दल मला जगभरातून खूप कौतुक मिळाले आहे त्यामुळेच मला सशक्त भूमिकांसह अनेक चित्रपटाच्या ऑफर्स मिळत आहेत. ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ नंतर अता आम्रपाली मध्ये काम करायला मिळणं या सारखं सुख अजून काय हवं ! आम्रपाली माझ्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज असेल ”
संगीतकार इस्माईल दरबार म्हणाले, “‘हम दिल दे चुके सनम’ आणि ‘देवदास’ नंतर ‘आम्रपाली’ हा माझ्यासाठी सर्वात आव्हानात्मक संगीतमय प्रवास असेल कारण ही कथा एका नर्तिकेची आहे, जी आयुष्यापासून निराश होऊन अध्यात्मवाद स्वीकारते.