गाऊनपासून साड्यांपर्यंत अंकिता लोखंडेचे कमालीचे लूक्स, फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ!

Ankita Lokhande Saree Looks : अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. पती विकी जैनसोबत ती बिग बॉसमध्ये सहभागी झाली होती.

बिग बॉसनंतर अंकिता लोखंडे ही 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमात झळकली होती.

अंकिता केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर स्टाईल आयकॉन देखील आहे. ती प्रत्येक लूक हा छान कॅरी करते यात शंका नाही.

अंकिताला साड्यांची प्रचंड आवड आहे. ती सतत आपले वेगवेगळ्या साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

राजेशाही थाट : आताही तिने आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत परिधान केलेल्या पिवळ्या बनारसी साडीत तिचा राजेशाही थाट दिसून येतो. या साडीत अंकिता खास उठून दिसतेय.

फ्लोरल ब्युटी : अंकिता या लूकमध्ये रेट्रो झोनमध्ये दिसतेय. मोहक पांढऱ्या फुलांची ऑर्गेन्झा साडीत अंकिता सुपर ग्रेसफुल दिसते.

शिमरी लिलाक स्टारलेट: अंकिता पेस्टल लिलाक ग्लिटरिंग साडीमध्ये हिऱ्यासारखी चमकताना दिसत आहे.

मिडनाइट ब्लू दिवा : या जबरदस्त मिडनाईट ब्लू टेसल गाउनसह अंकिता बोल्ड दिसतेय.

टॅसल इफेक्ट: अंकिताने या नीलमणी निळ्या रंगाच्या टेसल ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसतेय. साडीसोबत तिची सॉफ्ट कर्ल हेअरस्टाइल अप्रतिम दिसते.
