Download App

Amruta Khanvilkar साठी 2024 ठरतयं खास; नव्या शोमध्ये झाकीर खानसोबत दिसणार

Amruta Khanvilkar and Zakir Khan will together in New Show : लुटेरेमधून 2024 ची बॉलिवुडमय सुरुवात करून अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) पुन्हा एकदा बॉलिवुड मधल्या काही खास कलाकारांच्या सोबतीने दिसणार आहे. ती या शोमध्ये कॉमेडियन झाकीर खान ( Zakir Khan ) सोबत दिसणार आहे. 2024 मधला आमृताचा हा दुसरा बॉलिवुड प्रोजेक्ट असून ती आता अमेझॉन मिनी टीव्ही वरच्या ‘चाचा विधायक है हमारे 3’ ( New Show ) मध्ये झळकणार आहे. लुटेरेमधली अविका ते आता चाचा विधायक है हमारे 3 मधली सुरेखा जी हा अमृताचा बॉलिवुड प्रवास अखंड सुरूच आहे.

मिथुन चक्रवर्ती, उषा उथुप यांना पद्मभूषण, राष्ट्रपतींनी पद्म पुरस्कारांनी केले सन्मानित

अमृताने सोशल मीडियावरून ही खास बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे. अमृताने एक खास पोस्ट लिहिली आणि त्याला कॅप्शन देखील तितकच खास दिलं आहे. मार्केटमध्ये विधायक जी यांना टक्कर देण्यासाठी कोणी तरी येतंय खबर पक्की आहे ! असं म्हणत अमृताने या शो वर शिक्कमोर्तब केला आहे. “चाचा विधायक है हमारे 3 ” हा वेब शो नक्कीच भन्नाट असणार यात शंका नाही. या सगळ्या बद्दल बोलताना अमृता म्हणते ” लुटेरे नंतर अजून एक बॉलिवुड प्रोजेक्ट करताना खूप आनंद होतोय.

बंडखोरी कायम मग, कारवाई तर होणारच; काँग्रेसचा विशाल पाटलांवर कारवाईचा ‘मूड’

अमेझॉनसारख्या बड्या ओटीटी प्लॅटफॉर्म वर आमची वेब सीरिज येते याहून मोठी गोष्ट काय असणार ! विधायक जी यांना टक्कर देणारी सुरेखा नक्की काय भूमिका बजावणार ? याची मला जेवढी उत्सुकता आहे तेवढीच प्रेक्षकांना सुद्धा याची उत्सुकता आहे. कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारत राहून प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहण्यासाठी अजून काम करण्याची प्रेरणा यातून मिळते. चाचा विधायक है हमारे सीजन 3 मध्ये झाकीर खान सारखा दर्जेदार कॉमेडियन सोबत काम करण्याचा योगायोग या निमित्ताने जुळून आला आणि आता हा शो लवकरच सगळ्यांचा भेटीला येतोय म्हणून मी खूप उत्सुक आहे”

आगामी काळात अमृता मराठीत देखील अफलातून प्रोजेक्ट्स घेऊन येणार असून ” कलावती ” , ” ललिता बाबर ” , ” पठ्ठे बापूराव ” अश्या तिच्या उत्कंठावर्धक प्रोजेक्ट्स साठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 2024 वर्ष अमृतासाठी दर्जेदार प्रोजेक्ट्सच ठरणार यात शंका नाही.

follow us