बंडखोरी कायम मग, कारवाई तर होणारच; काँग्रेसचा विशाल पाटलांवर कारवाईचा ‘मूड’
Nana Patole on Vishal Patil : विशाल पाटील यांच्यावर कारवाई होईल. पक्षविरोधी कारवायांच्या आधारावर त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल. निवडणुकीत त्यांनी माघार घ्यावी यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात आले. त्यांची मनधरणी करण्यात आली. त्यांना कुणीतरी फूस लावत आहे असं चित्र आहे. आता 25 तारखेला आम्ही कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत काय तो निर्णय होईल, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगली मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना इशारा दिला. सांगली लोकसभा मतदारसंघात काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, विशाल पाटील यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे या मतदारसंघात आता तिरंगी लढत निश्चित झाली आहे.
विनवण्या, मनधरणी, समजावलं पण, गडी कायं हटला नाही; सांगलीच्या मैदानात तीन पाटलांमध्ये लढत..
विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्याकंडून भरपूर प्रयत्न करण्यात आले. परंतु, त्यांनी माघार घेतली नाही. काही झाले तरी निवडणूक लढणारच असा त्यांचा पवित्रा आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचेही त्यांनी याबाबतीत ऐकलं नाही. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी काँग्रेसने चालवल्याचे दिसत आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तसे स्पष्ट संकेत दिले. त्यांची मनधरणी करण्यात आली. त्यांना कुणीतरी फूस लावत आहे असं चित्र आहे. आता 25 तारखेला आम्ही कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत काय तो निर्णय होईल, अशी माहिती नाना पटोलेंनी दिली. त्यांच्या या वक्तव्यावर विश्वास ठेवला तर काँग्रेस विशाल पाटील यांच्यावर कारवाईच्या मूडमध्य दिसत आहे. त्यामुळे आता गुरुवारच्या बैठकीत काय निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ठरलं! सांगलीत विजयासाठी विशाल पाटील मतदारांकडे ‘लिफाफा’ घेऊन जाणार; आयोगाने दिलं चिन्ह
विशाल पाटलांना मिळालं ‘लिफाफा’ चिन्ह
लोकसभा निवडणुकीसाठी सांगलीतून विशाल पाटलांनी (Vishal Patil) अर्ज मागे न घेतल्याने आता येथे तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, विशाल पाटलांना निवडणुकीसाठी आयोगाकडून लिफाफा हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे आता सांगलीतून विजय मिळावा यासाठी मतदारांकडे विशाल पाटील लिफाफा घेऊन मतदारांच्या दारात जाणार आहेत.
दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेस सांगलीच्या प्रचारात दिसेल असे विधान केले होते. मात्र, त्यानंतरही काल (दि.22) विशाल पाटलांनी सांगलीतून त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यानंतर आता विशाल पाटलांना निवडणूक आयोगाने लिफाफा हे चिन्ह देण्यात दिले. सांगलीत तिरंगी लढत होणारच हे चित्र स्पष्ट झाले आहे. विशाल पाटील माघार घेऊन प्रचारात सहभागी होतील असा विश्वास राऊतांनी सांगलीत बोलून दाखवला होता. मात्र, आता विशाल पाटलांनी माघार न घेतल्याने एकप्रकारे राऊतांच्या गाव्याला मोठा तडा गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.