सांगलीत तिरंगी नाही तर दुरंगीच लढत; विशाल पाटलांनी थेट सांगितलं

सांगलीत तिरंगी नाही तर दुरंगीच लढत; विशाल पाटलांनी थेट सांगितलं

Sangli Loksabha : सांगली लोकसभा मतदारसंघात (Sangli Loksabha) तिरंगी नाही तर दुरंगीच लढत होणार असल्याचं काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटलांनी (Vishal Patil) सांगितलं आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने विशाल पाटलांनी बंडखोरी करीत अपक्ष रिंगणात उतरले आहेत. विशाल पाटलांनी अर्ज दाखल केल्यानंतर आज अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता, त्यांची महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी मनधरणी केली मात्र, विशाल पाटलांनी अर्ज कायम ठेवला आहे.

‘खडकवासला’ कोणाला पाजणार पाणी? भाजपच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा मुक्काम, सुळेंचीही फिल्डिंग

पुढे बोलताना विशाल पाटील म्हणाले, आमच्या अनेकांची इनकमिंग होत आहे. अनेक कार्यकर्ते आमच्यासोबत येण्यास तयार आहेत. सांगली लोकसभेची निवडणूक तिरंगी होणार असल्याचं अनेकजण म्हणत आहेत पण प्रत्यक्षात मी काँग्रेसचा बंडखोर उमेदवार विरोधात संजय काका पाटील यांच्यातच लढत होणार असल्याचं विशाल पाटलांनी थेट सांगितलं आहे.

देशात मोदी सरकार विरोधात आणीबाणीपेक्षाही मोठी लाट, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा

सांगली लोकसभेच्या रिंगणात तसे एकूण 18 उमेदवार उभे आहेत. सक्षम उमेदवार निवडून येऊ नये आणि भाजपला सोपं जाण्यासाठी अनेकांनी डावपेच केले आहेत. चिन्ह चांगल मिळू नये म्हणूनही अनेकांनी प्रयत्न केले आहेत. तसेच बॅलेटवर खाली नाव यावे यासाठीही अनेकजण प्रयत्न करीत आहेत, अशा खालच्या पातळीवर राजकारण करणाऱ्यांना जनता येत्या 7 तारखेला धडा शिकवणार असल्याचंही विशाल पाटलांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

सांगलीत येत्या 7 मे रोजी मतदार पार पडणार आहे. निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर आज अखेर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांकडून त्यांना समजावलं जात होतं. अनेक विनवण्या केल्या, मनधरणीही केली मात्र, गडी काही मागे हटलाच नाही. विशाल पाटील यांनी आपला अर्ज कायमच ठेवत तिरंगी लढतीला आव्हान दिलं आहे. तर विशाल पाटलांचे बंधू माजी खासदार प्रतिक पाटील यांनी आपला उमेदवारीचा अर्ज मागे घेतला आहे.

सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी, अशी आग्रही मागणी विशाल पाटलांसह काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी दिल्लीवारी केली होती. दिल्लीतील हाय कमांड नेत्यांशी याबाबत चर्चा केली होती., अखेर सांगलीची जागा ठाकरे गटाकडे गेल्याने विशाल पाटील समर्थकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. कार्यकर्त्यांचा रोष एवढा वाढला अखेर विशाल पाटील यांनीच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा हट्ट कार्यकर्त्यांनी धरला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज