विनवण्या, मनधरणी, समजावलं पण, गडी कायं हटला नाही; सांगलीच्या मैदानात तीन पाटलांमध्ये लढत…

विनवण्या, मनधरणी, समजावलं पण, गडी कायं हटला नाही; सांगलीच्या मैदानात तीन पाटलांमध्ये लढत…

Sangli Loksabha Election : मागील अनेक दिवसांपासून सांगली लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीत (MVA) तिढा सुरु होता. कोणतीही जडजोड न झाल्याने अखेर काँग्रेसकडून इच्छुक असलेले विशाल पाटील (Vishal Patil) यांनी अपक्ष अर्ज कायम ठेवत तिरंगी लढत होणार असल्याला दुजोराच दिला आहे. विशाल पाटलांच्या अपक्ष उमेदवारीमुळे आता सांगलीत भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील, (SanjayKaka Patil) महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील, (Chandrahar Patil) आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.

सुरतला निघालो तेव्हा ठाकरेंनी दिली मुख्यमंत्रीपदाची ऑफर, पण मी…; CM शिंदेंनी सगळचं सांगितलं…

सांगलीत येत्या 7 मे रोजी मतदार पार पडणार आहे. निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर आज अखेर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांकडून त्यांना समजावलं जात होतं. अनेक विनवण्या केल्या, मनधरणीही केली मात्र, गडी काही मागे हटलाच नाही. विशाल पाटील यांनी आपला अर्ज कायमच ठेवत तिरंगी लढतीला आव्हान दिलं आहे. तर विशाल पाटलांचे बंधू माजी खासदार प्रतिक पाटील यांनी आपला उमेदवारीचा अर्ज मागे घेतला आहे.

पंतप्रधानांनी हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवणं हे दुर्दैव, जितेंद्र आव्हाड मोदींच्या ‘त्या’ विधानावर संतापले

सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी, अशी आग्रही मागणी विशाल पाटलांसह काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी दिल्लीवारी केली होती. दिल्लीतील हाय कमांड नेत्यांशी याबाबत चर्चा केली होती., अखेर सांगलीची जागा ठाकरे गटाकडे गेल्याने विशाल पाटील समर्थकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. कार्यकर्त्यांचा रोष एवढा वाढला अखेर विशाल पाटील यांनीच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा हट्ट कार्यकर्त्यांनी धरला.

गुन्हे शोध पथकांमध्ये आता महिला पोलिस; नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिकांचा धडकेबाज निर्णय

अखेर पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुर्नविचार करण्याची संधी विशाल पाटलांनी खुलेआम पत्रकार परिषद घेऊन दिली होती. त्यासाठी दोन दिवसांची मुदतही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांना दिली होती. अखेर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निर्णय न बदलल्याने विशाल पाटलांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनेक शर्थीचे प्रयत्न केले मात्र, त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.

दरम्यान, आता सांगलीमध्ये विशाल पाटील यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. एकंदरीत सांगलीत तीन पाटलांमध्ये चुरशीची लढत होणार असून कोणते पाटील बाजी मारणार हे 4 जूनलाच कळणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज