Download App

Aditya Kapur Dating: प्रेमात आकंठ बुडालेत आदित्य अन् अनन्या पांडे! नवे फोटो व्हायरल 

Ananya Panday and Aditya Roy Kapur Romance: बॉलिवूडमध्ये (Bollywood) रोज नवीनवीन कपल्स बघायला मिळतात अन् काहीच दिवसांत त्यांच्या ब्रेकअप झाल्याची बातमी देखील समोर येत असते. या सगळ्या गोष्टी अगदी सहज घडत असल्याचे दिसून येत असतात. परंतु सध्या बॉलिवूडमध्ये एका नव्याकोऱ्या जोडीची चांगलीच चर्चा रंगत असल्याचे समोर येत आहे.

सध्या चर्चेत असलेली ही जोडी आहे अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy). आजकाल बॉलिवूडमध्ये या दोघांच्या नात्याची जोरदार चर्चा रंगत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून हे कपल एकत्र सुट्टीचा आनंद घेत आहे. यावेळी सोशल मीडियावर दोघांचे सिक्रेट फोटो देखील सोशल मीडियावर चांगलंच धुमाकूळ घालत असल्याचे समोर आले आहे. आता समोर आलेल्या नव्या फोटोमध्ये देखील दोघे एकमेकाला डेट करत असल्याचे दिसत आहे.

…म्हणून चिन्मय मांडलेकर म्हणतोय, उद्या मिळणार एक आनंदाची बातमी!

आदित्य आणि अनन्या सध्या पोर्तुगालमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवत असल्याचे दिसून येत आहे. या कपलचा आणखी एक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर चांगलंच धुमाकूळ घालत आहे. या फोटोमध्ये दोघे एकमेकांशी बोलत असल्याचे देखील दिसून येत आहे. स्पेनमधील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये धमाल केल्यावर लिस्बनमधील रेस्टॉरंटमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवत असल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान दोघेही त्यांच्या ड्रिंक्सचा आनंद लुटत असल्याचे दिसून येत आहेत.

‘गदर’ला अख्ख्या बॉलिवूडचा विरोध, सनी देओलचा मोठा खुलासा…

लंच आणि ड्रिंक्सचा आनंद घेत असताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहेत. यादरम्यान, अभिनेत्रीने पांढरा टीशर्ट सँडो आणि स्वेटर परिधान केले होते. तर, लेझी बन, नो-मेकअप लूक आणि बॅकपॅकसह तिने तिचा हा लूक पूर्ण केला. तर, ‘द नाईट मॅनेजर’ फेम अभिनेता आदित्य रॉय कपूर अतिशय कॅज्युअल नेव्ही ब्ल्यू लिनन शर्टमध्ये दिसला आहे. नेहमीप्रमाणेच तो साध्या लूकमध्ये देखील खूपच हँडसम दिसत होता.

या आधी देखील त्यांचे लिस्बनमधील अनेक फोटो व्हायरल झाले होते. यातील काही फोटोंमध्ये आदित्य अनन्याला मिठी मारताना दिसला होता. या फोटोंवरून दोघांनीही आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं असल्याचं म्हटलं आहे. यादरम्यान अनन्या पांडे निळ्या रंगाचा मॅक्सी ड्रेस परिधान केलेली दिसली होती. तर, आदित्य साधा टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसला होता.

Tags

follow us