Download App

Aranmanai 4: तमन्ना भाटियाचा ‘अरनमानाई 4’ यंदाच्या वर्षातील पहिला तमिळ हिट चित्रपट ठरला

Tamannaah Bhatia: अभिनेत्री तमन्ना भाटियाचा चाहता वर्ग मोठा आहे. तमन्ना ही हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते.

Tamannaah Bhatia: अभिनेत्री तमन्ना भाटियाचा (Tamannaah Bhatia) चाहता वर्ग मोठा आहे. तमन्ना ही हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. नुकताच तमन्नाचा ‘अरनमानाई 4’ (Aranmanai 4) सिनेमाने नवा विक्रम केला असून तामिळ चित्रपट उद्योगात मोठा प्रभाव पाडला आहे. हा चित्रपट या वर्षातील पहिला मोठा तमिळ (Tamil film) हिट ठरला असून याने तमिळ चित्रपट उद्योगात एक विक्रमी कमाई केली आहे.


जगभरात 21 कोटींहून अधिक कलेक्शनसह याने बॉक्स ऑफिसवर (Box Office) दमदार कमाई केली आहे. सुंदर सी दिग्दर्शित या हॉरर कॉमेडीमध्ये सेल्वी आणि डॉ. माया यांची भूमिका करणाऱ्या तमन्ना आणि राशीच्या (Raashii Khanna) अभिनयाचं सर्वत्र तोंडभरून कौतुक होताना पाहायला मिळत आहे. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला असून दोन दिवसांत एकूण 10.50 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह दुस-या दिवशी 40 टक्के कमाई झाली आहे. या हॉरर कॉमेडीने भारतात तिसऱ्या दिवशी सर्व भाषांसाठी 7.50 कोटी कमाई केली, ज्यामुळे बहु-भाषिक चित्रपटाची एकूण कमाई 18.80 कोटीवर येऊन थांबली आहे.

वर्कफ्रंटवर तमन्ना तेलगू चित्रपट ‘ओडेला 2’ मध्ये ‘शिवशक्ती’च्या रुपात रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. जॉन अब्राहमसोबत निखिल अडवाणीच्या वेदा या हिंदी चित्रपटातही ती दिसणार आहे. ओटीटी (OTT) आघाडीवर ती Dharmatic च्या वेब सिरीज ‘डेअरिंग पार्टनर्स’ मध्ये चमकणार आहे. तिच्याकडे एक शीर्षकहीन OTT चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन नीरज पांडे करणार आहेत.

Housefull 5 : अक्षय कुमारच्या ‘वेलकम 5’ मध्ये आता ‘या’ अभिनेत्यांची एन्ट्री

गेल्या काही दिवसांपासून तमन्ना ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेता विजय वर्मा आणि तमन्नाच्या अफेअरची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. तमन्नानं विजयसोबतच्या तिच्या नात्याबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं. ती म्हणाली होती की, विजय हा तिच्या हॅप्पी प्लेससारखा आहे.

follow us