Housefull 5 : अक्षय कुमारच्या ‘वेलकम 5’ मध्ये आता ‘या’ अभिनेत्यांची एन्ट्री

Housefull 5 : अक्षय कुमारच्या ‘वेलकम 5’ मध्ये आता ‘या’ अभिनेत्यांची एन्ट्री

Housefull 5 Shooting : बॉलिवूडची (Bollywood) कॉमेडी फ्रँचायझी ‘हाऊसफुल’ (Housefull 5 Movie) गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांना हसवत आहे. हाऊसफुलच्या 4 यशस्वी भागांनंतर आता त्याच्या पाचव्या भागाची तयारी सुरू आहे. हाऊसफुल 5 च्या निर्मितीचे काम सुरू आहे आणि एकामागून एक तारे सिनेमात दाखल होत आहेत. अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) बनत असलेल्या हाऊसफुलमधील दुसऱ्या अभिनेत्याच्या एंट्रीला अधिकृतरित्या पक्के करण्यात आले आहे.

हाऊसफुल 5 चे निर्माते साजिद नाडियादवाला (Sajid Nadiadwala) यांनी आपल्या कॉमेडी चित्रपटात आता अभिनेता अभिषेक बच्चनला (Abhishek Bachchan) घेतले आहे. ‘हाऊसफुल 3’ मध्ये आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ज्युनियर बच्चन ‘हाऊसफुल 5’ मध्ये देखील असाच करिष्मा करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

तरुण मनसुखानी ‘हाऊसफुल 5’ चे दिग्दर्शन करत आहेत आणि साजिद नाडियादवाला या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज 6 मे रोजी अभिषेक बच्चनच्या हाउसफुल 5 मध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. साजिदने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर लिहिले आहे की, सांगताना खूप आनंद होत आहे की, अभिषेक बच्चन पुन्हा एकदा हाऊसफुलच्या घरात सामील होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)


हाउसफुल (2010) – स्टार कास्ट – अक्षय कुमार, रितेश देशमुख, अर्जुन रामपाल, दीपिका पदुकोण, जॅकलिन फर्नांडिस, जिया खान, लारा दत्ता, बोमन इराणी, चंकी पांडे.

हाउसफुल 2 (2012)- स्टार कास्ट- अक्षय कुमार, जॉन अब्राहम, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे, शाजहान पदमसी, जॅकलीन, असीन, जरीन खान, ऋषी आणि रणधीर कपूर, बोनम इराणी, मिथुन चक्रवर्ती, जॉनी लीव्हर, चंकी पांडे.

हाउसफुल 3 (2016), स्टार कास्ट – अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जॅकलीन फर्नांडिस, लिसा हेडन, नर्गिस फाखरी, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, बोमन इराणी.

हाऊसपुल 4 (2019)- स्टार कास्ट – अक्षय कुमार, बॉबी देओल, रितेश देशमुख, कृती सेनॉन, क्रिती खरबंदा, पूजा हेगडे, चंकी पांडे, रणजीत, जॉनी लीव्हर, नवाजुद्दीन सिद्दीकी, अर्चना पूरण सिंग, दक्षिण अभिनेता राणा दग्गुबती.

हाउसफुल 5- स्टार कास्ट- अक्षय कुमार आणि अभिषेक बच्चन, अनिल कपूर, नाना पाटेकर, रितेश देशमुख आणि चंकी पांडे…. कास्टिंग चालू आहे.

Kangana Ranaut: अभिनेत्रीने प्रचारादरम्यान थेट बिग बीं यांच्यासोबत केली स्वतःची तुलना, म्हणाली…

मीडिया रिपोर्ट्सनुसार हाऊसफुल 5 चे शूटिंग ऑगस्ट महिन्यात ब्रिटनमध्ये सुरू होणार आहे. असे म्हटले जात आहे की हे 45 दिवसांचे शूटिंग शेड्यूल असेल, यामध्ये रणबीर कपूरचा मेगा-ब्लॉकबस्टर चित्रपट ‘ॲनिमल’ चा खलनायक बॉबी देओल देखील सामील होऊ शकतो. त्यात अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांची नावे अंतिम आहेत. चित्रपटाचे बजेट 400 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण क्रूझवर होणार आहे. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. साजिद नाडियादवाला चालू वर्षात त्याच्या चित्रपटांवर सुमारे 1 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे, यामध्ये सलमान खानचा चित्रपट ‘सिकंदर’ देखील समाविष्ट आहे, जो आगामी ईद 2025 ला प्रदर्शित होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube