अश्विनी महांगडे दिसणार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या भूमिकेत

Ashwini Mahangade in Ahilyabai Holkar Movie :  अश्विनी महांगडे ही अभिनेत्री कमी कालावधीतच अधिक लोकप्रिय झाली. झी मराठी वाहिनीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये तिने संभाजी महाराजांची बहीण राणूअक्का यांची भूमिका केली होती. या भूमीकेने अश्विनी घराघरांत पोहोचली. यानंतरदेखील तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. पण तिला खरी ओळख मिळाली ती राणूअक्कांच्या भूमिकेमुळे. आता तिचे नाव […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 20T183352.024

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 05 20T183352.024

Ashwini Mahangade in Ahilyabai Holkar Movie :  अश्विनी महांगडे ही अभिनेत्री कमी कालावधीतच अधिक लोकप्रिय झाली. झी मराठी वाहिनीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये तिने संभाजी महाराजांची बहीण राणूअक्का यांची भूमिका केली होती. या भूमीकेने अश्विनी घराघरांत पोहोचली. यानंतरदेखील तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. पण तिला खरी ओळख मिळाली ती राणूअक्कांच्या भूमिकेमुळे.

आता तिचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अश्विनी आता पुन्हा एकदा एका मोठ्या ऐतिहासिक भूमिकेमध्ये दिसणार आहे. याबाबत तिने स्वत माहिती दिली आहे. तिने एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला तिने खास कॅप्शनही दिले आहे. तिच्या या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अश्विनीने तिच्या आगामी चित्रपटाची माहिती या पोस्टमध्ये दिली आहे. आगामी चित्रपटामध्ये अश्विनी अहिल्या बाई होळकर यांची भूमिका साकारणार आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ असे या चित्रपटाचे नाव आहे.

मराठमोळ्या Ajay-Atul ने संगीतबद्ध केलेलं Adipurush चं पहिलं गाणं रिलीज

अश्विनी म्हणते, ”इंदूर संस्थानचे संस्थापक, वीर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करते. आज अतिशय आनंदाची बातमी माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. खुप मोठी जबाबदारी, मनावर दडपण आणि तितकाच आनंद होत आहे.”

”माझी प्रमुख भुमिका असलेला “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” या चित्रपटाची आज घोषणा झाली. रसिक मायबाप प्रेक्षकहो याही चित्रपटावर आपण प्रेम करावे. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. ” अशा शब्दात अश्विनीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, अश्विनी ही सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेत काम करते आहे. अश्विनी या मालिकेत अनघा ही भूमिका साकारत आहे. तसेच अश्विनी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. वेगवेगळे फोटोज् ती आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते.

Exit mobile version