मराठमोळ्या Ajay-Atul ने संगीतबद्ध केलेलं Adipurush चं पहिलं गाणं रिलीज

मराठमोळ्या Ajay-Atul ने संगीतबद्ध केलेलं  Adipurush चं पहिलं गाणं रिलीज

Adipurush New Song Out Now :‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला चाहत्यांनी मोठी पसंती देखील दिली आहे. त्यानंतर आता या चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. ‘जय श्री राम’ असं या गाण्याचं नाव आहे. रिलीज होताच या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

गीतकार मनोज मुंतसिर शुक्ला यांनी हे गाणं लिहिलं आहे. तर मराठीतील प्रसिद्ध संगीतकारांची जोडी अजय-अतुल यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि पोस्टरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता या चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला गेली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेता प्रभासने (Prabhas) या सिनेमाचे एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होतं. या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले. प्रभासने या पोस्टरला खास कॅप्शन देखील दिले आहे. ‘मंगलमय हर भक्त होगा, जब आदिपुरुष का स्वागत होगा, One month to go! जय श्री राम’.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

पोस्टरमध्ये प्रभासबरोबर देवदत्त नागे (Devdatta Nage) देखील दिसत आहे. प्रभास आदिपुरुष या सिनेमात श्री रामाची भूमिका साकारली आहे, तर देवदत्तनं या सिनेमात हनुमानाची भूमिका साकारली आहे. प्रभासनं शेअर केलेल्या आदिपुरुष सिनेमाच्या या नव्या पोस्टरला चाहत्यांनी देखील मोठी पसंती दिली आहे.

The Kerala Story च्या स्पेशल स्क्रीनिंगविरोधात FTII मध्ये विद्यार्थी आक्रमक

या सिनेमात अभिनेता प्रभास (Actor Prabhas) हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसला आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेचे पात्र साकारत आहे. हैदराबादमध्ये ‘आदिपुरुष’ या सिनेमाच्या ट्रेलरचे खास स्क्रीनिंग करण्यात आले होते.त्यानंतर आता चाहत्यांसाठी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरच्या सुरुवातीला हनुमान हा गुहेत तपश्चर्या करत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर मग श्रीराम, लक्ष्मण हे सीतेसह वनवासात जात असल्याचे देखील दिसून आले आहे.

आता हा सिनेमा 16 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘आदिपुरुष’ या सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यानंतर हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. टीझरमध्ये वापरण्यात आलेल्या व्हीएफएक्सवर जोरदार टीका होत होती. तसेच या सिनेमातील सैफच्या लूकवरूनही वाद निर्माण झाला. अनेकांनी सैफच्या लूकवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube