Download App

Bad Newz: विकी कौशलच्या ‘बॅड न्यूज’ची बंपर ॲडव्हान्स बुकिंग; पहिल्याच दिवशी होणार जबरदस्त कमाई

Bad Newz Advance Booking: विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि ॲम्मी विर्कची 'बॅड न्यूज' (Bad Newz Movie) थिएटरमध्ये चांगली बातमी आणण्यासाठी सज्ज आहे.

Bad Newz Advance Booking: विकी कौशल (Vicky Kaushal), तृप्ती डिमरी (Tripti Dimri) आणि ॲम्मी विर्कची ‘बॅड न्यूज’ (Bad Newz Movie) थिएटरमध्ये चांगली बातमी आणण्यासाठी सज्ज आहे. (Advance Booking) हा चित्रपट 19 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून लोकांमध्ये याविषयी उत्सुकता वाढत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आता 2 दिवस उरले असून मंगळवारी ॲडव्हान्स बुकिंग सुरू करण्यात आले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ॲडव्हान्स बुकिंगमध्ये जोरदार कमाई केली आहे. येत्या काही दिवसांत हे बुकिंग आणखी वाढणार आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ‘बॅड न्यूज’ची स्थिती कशी आहे चला तर मग पाहूया…


मिळालेल्या माहितीनुसार सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंग 16 जुलै रोजी सुरू झाले. बुकिंग सुरू होऊन एक दिवस झाला असून आज सकाळी 10 वाजेपर्यंतची आकडेवारीही समोर आली आहे. या चित्रपटाची 8 हजार पेक्षा जास्त तिकिटे विकली गेली आहेत.

ॲडव्हान्स बुकिंगची ‘ही’ अट आहे

बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, बॅड न्यूजने 24 तासांत 8 हजाराहून अधिक तिकिटे विकली आहेत. ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’पेक्षा चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग 50 टक्क्यांनी जास्त आहे. ॲडव्हान्स बुकिंग असेच सुरू राहिल्यास चित्रपट पहिल्या दिवशी 8 कोटींहून अधिक कलेक्शन करेल.

Vicky Kaushal: शूटिंग दरम्यान सेटवर अभिनेत्याला झाली दुखापत, आता घेतोय अशी काळजी

पहिल्या दिवशी इतकी कमाई

‘बॅड न्यूज’ पहिल्या दिवशी 10 कोटी रुपये कमवू शकते अशी चर्चा सध्या सुरु आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा अंदाज बांधला आहे. चित्रपटाचे आणखी एक गाणे हिट झाले तर चित्रपटाला 10 कोटींची कमाई व्हायला वेळ लागणार नाही, अशी चर्चा होत आहे.

सरफिरा आणि इंडियन 2 चित्रपटगृहांमध्ये जोरात टक्कर सुरु आहेत. जर बॅड न्यूज प्रेक्षकांना आवडली असेल तर ती बॉक्स ऑफिसवर चित्रपटांना स्पर्धा देताना दिसेल. आनंद तिवारीच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘बॅड न्यूज’ हा सिनेमा थोड्या वेगळ्या विषयावर आहे जो लोकांना प्रभावित करू शकणार आहे.

follow us