Download App

Video : अक्षय-टायगरची पद्यामागाची गंमत, पाहा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या बीटीएसची झलक

Bade Miyan Chote Miyan On BTS : अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) सध्या त्यांच्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chote Miyan Movie) या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहेत. एकीकडे चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत असताना दुसरीकडे नुकताच चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या शूटिंगदरम्यानचा अक्षय आणि टायगरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ रिलीज होताच सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाला आहे. हा ॲक्शन व्हिडिओ शेअर करून निर्मात्यांनी चाहत्यांचा उत्साह आता गगनाला भिडला आहे.


अक्षय- टायगरचा ॲक्शन व्हिडिओ शेअर: जॅकी भगनानीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chote Miyan Movie) चित्रपटाचा पडद्यामागील व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसह एक कलाकार पाहायला मिळाले आहेत. जो संपूर्ण टीमसोबत ॲक्शन सीन शूट करण्यात व्यस्त आहे. जॅकीने व्हिडिओला कॅप्शन दिले आहे, ‘वास्तविक कृतीचा एक नवीन बेंचमार्क सेट केला गेला आहे, सीमा ओलांडणाऱ्या असाधारण ॲक्शन सीक्वेन्सचा अनुभव घेण्याची वेळ आली आहे.’

अली अब्बास जफर म्हणाले की, ‘लोक मला अनेकदा विचारतात की मोठे ॲक्शन चित्रपट बनवण्याचे हे वेडे आकर्षण काय आहे, मात्र माझ्याकडे उत्तर नाही. मी सहसा असे म्हणतो की कदाचित घाबरण्याची आणि अशक्य गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करण्याची प्रवृत्ती आहे. ‘बडे मियाँ और छोटे मियाँ’ या चित्रपटाबद्दल ते पुढे म्हणाले की, या चित्रपटातील ॲक्शनचा कॅनव्हास अतिशय खरा आहे, जो ॲक्शनप्रेमींसाठी एक भेट असणार आहे.

निर्माता जॅकी भगनानी पुढे म्हणाले, ‘बडे मियाँ छोटे मियाँमध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ हे दोन मोठे ॲक्शन स्टार्स पहिल्यांदा एकत्र आहेत. या चित्रपटात ॲक्शन दृश्ये खरी वाटावीत यासाठी आम्ही अधिक लक्ष दिले आहे. या चित्रपटातील ॲक्शन सीन्स स्फोटक आणि ओरिजिनल असावेत आणि आम्ही ते तसे बनवले आहेत. जो खरा वाटतो, प्रेक्षकांना तो आवडेल अशी आम्हाला आशा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे.

हृता दुर्गुळे पाहतेय तिच्या नवरोबाची वाट, कन्नीमधील रॅप सॉंग प्रदर्शित

ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार: फेब्रुवारी 2023साठी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ची घोषणा करण्यात आली. हा चित्रपट दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केला असून पूजा एंटरटेनमेंट आणि एफझेड फिल्म्सचे समर्थन आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सोबतच, चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन देखील दिसणार आहे, जो नुकताच ‘सालार पार्ट वन: सीझफायर’ मध्ये दिसला होता. वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ 2024 च्या ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याआधी जवळपास 75 दिवस या चित्रपटाचे प्रमोशन केले जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट पाच भाषांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे.

follow us