Bigg Boss 5 winner Suraj Chavan will be on the show who his future wife is : अगोदर रील स्टार म्हणून आणि नंतर बिग बॉस मराठी 5 चा विजेता म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सूरज चव्हाण लवकरच बोहल्यावर चढणार आहे. सध्या सोशल मिडीयावर त्याच्या लग्नाची आणि होणाऱ्या पत्नीची प्रचंड चर्चा आहे. मात्र त्याची होणारी पत्नी नेमकी कोण? त्याचं लग्न जमलं कसं? त्याचं लव्ह मारिज आहे की, अरेंज जाणून घ्या सविस्तर…
वेब सीरिजमधून भेटीला येणार आदिनाथ कोठारे; आगामी डिटेक्टिव धनंजय वेब सीरिजचा मुहूर्त संपन्न
गेल्या काही दिवसांपूर्वीच सोशल मिडियावर सूरजच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा आणि नाव समोर आले आहेत. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. त्यानंतर आता मात्र त्याची होणारी पत्नी नेमकी कोण? त्याचं लग्न जमलं कसं? त्याचं लव्ह मारिज आहे की, अरेंज अशी सर्व माहिती समोर आली आहे. कारण सुरजच्या लग्नानिमित्ता कोकण हार्टेड गर्ल या कॉन्टेट क्रिएटर आणि बिग बॉसमध्ये सूरजची सहस्पर्धक असलेल्या अंकिता वालावलकर हिने त्याला केळवण केलं.
या केळवणाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावलर व्हायरल झाले. तेव्हा सूरजच्या पत्नीचे फोटो समोर आले आहेत. तर यावर अंकिताने माहिती दिली. त्या प्रमाणे सूरज चव्हाणची होणाऱ्या पत्नीचं नावं हे संजना असं आहे. तर ती सूरजच्या चुलत मामाची मुलगी आहे. तसेच सूरजचं हे लग्न लव्ह मॅरिज आहे. त्यामुळे सूरजच्या चाहत्यांची उत्सुकता आता लग्नासाठी वाढली आहे. तर सूरजचा लग्न सोहळा 29 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. हा सोहळा पारंपारिक पद्धतीने पुण्यातील जेजूरी, सासवड या ठिकाणी होणार आहे. यामध्ये हळद, मेहंदी आणि संगीत अशा कार्यक्रमांचा यामध्ये समावेश असणार आहे.
