Download App

Bigg Boss Marathi: रितेश भाऊ सगळ्यांचाच हिशोब करणार चुकता; पाहा भाऊचा धक्का न चुकता

Bigg Boss Marathi New Season Day 35 : 'बिग बॉस मराठी'चा हा ( Bigg Boss Marathi New Season) पाचवा आठवडा चांगलाच गाजला.

Bigg Boss Marathi New Season Day 35 : ‘बिग बॉस मराठी’चा हा पाचवा आठवडा चांगलाच गाजला. (Bigg Boss Marathi New Season) गेल्या आठवड्यात रितेश भाऊंनी चक्रव्ह्यू दाखवल्यानंतर काही नात्यांची चक्र गरागर फिरली. जोड्यांच्या बेडीत सदस्य बांधले गेले. (Bigg Boss Marathi New Promo) काही जोड्या चांगल्या गाजल्या. या आठवड्यात सदस्यांना एक भयचकित धक्का मिळाला. (Bigg Boss Marathi ) घरात एक रहस्यमय पाहुणा अवतरला. सोन्याची नाणी मिळवताना सदस्यांचा गेम झाला. आता आज भाऊच्या धक्क्यावर (Bhaucha Dhakka) सदस्यांची शाळा घेण्यासाठी सज्ज आहे.


‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश भाऊ आज सदस्यांची चांगलीच कानउघडणी करणार आहे. प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणतोय,”बिग बॉस मराठी’च्या घराला भूताने झपाटलं… काहींच्या अंगात जिंकण्याचं वारं भरलं..याच नादात सगळ्यांचं काहीतरी चुकलं. सगळ्यांचाच हिशोब करुयात चुकता.. बघा भाऊचा धक्का न चुकता”. बिग बॉस मराठीच्या या आठवड्यात सदस्यांना त्यांच्याच मित्रांचे खरे चेहरे दिसले आहेत. आता सदस्यांची खेळण्याची पुढची चाल काय असेल याकडे सर्वांचचं लक्ष लागलं आहे. तसेच आजचा भाऊचा धक्काही खास असणार आहे.

टीश्यूवरुन बिग बॉसच्या घरात वाद!

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य कधी कोणत्या कारणाने एकमेकांसोबत वाद घातलील हे सांगू शकत नाही. आज घरात शुल्लक टिश्यू पेपरवरुन वाद रंगलेला पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सदस्य एकमेकांवर कुरघोडी करताना दिसणार आहेत. प्रेक्षकांना मात्र त्यांच्यातील रंगलेला हा वाद पाहताना मजा येणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये सदस्य एकमेकांच्या कुरघोडी करताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये निक्की म्हणतेय,”आम्हाला टिश्यू दिसला तर आम्ही तसचं ठेऊ”. त्यावर अरबाज म्हणतोय,”निक्कीने उचलला तर त्यात कमीपणा नाही आहे”. अभिजीत म्हणतो,”एकमेकांच्या कुरघोड्या करू नका”.

Bigg Boss Marathi 5: ‘आम्ही कुरघोड्या करायला आलेलो नाही’, टीश्यूवरुन बिग बॉसच्या घरात वाद!

अभिजीतला उत्तर देत डीपी दादा म्हणतो,”आम्ही कुरघोड्या करायला आलेलो नाही. निक्की आता चुकतेय असं तुला वाटत नाही का?”. अभिजीत म्हणतो,”जे चुकत आहेत त्यांनी स्वत: समजावं”. यावर निक्की म्हणते,”असं असेल तर प्रत्येकाने आपलं आपलं काम स्वत: करा”. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य आता विभागले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्यातील ड्रामा पाहणं इतरांसाठी मात्र मनोरंजक ठरत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात सदस्यांनी चांगलाच धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे.

follow us