Download App

Bigg Boss Marathi: भाऊच्या धक्क्यावर रितेशने केली जान्हवीची बोलती बंद

Bigg Boss Marathi: बांगड्या हे सौंदर्यतेचं प्रतीक आहे (Jahnavi Killekar) आणि याच बांगड्यांवरुन जान्हवीने केलेलं भाष्य संपूर्ण महाराष्ट्राला खटकलं आहे.

Bigg Boss Marathi Day 14: ‘बिग बॉस मराठी’चा यंदाचा दुसरा भाऊचा धक्का खूप विशेष असणार आहे. (Bigg Boss Marathi ) पहिल्या भाऊच्या धक्क्यावर (Ritesh Deshmukh) रितेशने निक्कीची शाळा घेतली होती. (BB Marathi) तर दुसऱ्या भाऊच्या धक्क्यावर तो जान्हवीची बोलती बंद करताना दिसणार आहे. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात बांगड्यांचं खूप महत्त्व असतं. (Bigg Boss Marathi Day 14) बांगड्या हे सौंदर्यतेचं प्रतीक आहे (Jahnavi Killekar) आणि याच बांगड्यांवरुन जान्हवीने केलेलं भाष्य संपूर्ण महाराष्ट्राला खटकलं आहे. यावरु भाऊच्या धक्क्यावर रितेश जान्हवीला चांगलंच सुनावणार आहे.


‘बिग बॉस मराठी’च्या भाऊच्या धक्क्यावर जान्हवीला बांगड्या घालण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर जाब विचारतो. रितेश भाऊ म्हणतो,”बांगड्या म्हणजे शक्तीचं प्रतीक असलं पाहिजे. याच बांगड्या घालणाऱ्या स्त्रिया फक्त घर नाही तर देश सांभाळतात. बाकीच्यांना बाहेर काढेल की नाही माहिती नाही…पण तुम्हाला नक्की काढेल”.

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा ‘लय भारी’ खेळ सुरू झाला आहे. नव्याचे नऊ दिवस संपलेत आणि एकमेकांच्या नाकीनऊ आणणं सुरू झालंय. दुसऱ्या आठवड्यात काही चतुर म्हणून पुढे आले तर काही फितुर म्हणून. पण तरी या सगळ्यात कोण आहे राईट आणि कोण आहे वाईट हे भाऊच्या धक्क्यावर कळेल. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. प्रेक्षकांनी या सीझनला सुपरहिट केलंय. या आठवड्याच्या खेळाचा महाराष्ट्रभर चांगलाच बोलबाला आहे.

जान्हवीने दिली धमकी

वर्षा उसगावकर आणि जान्हवी यांच्या मध्ये जोरदार भांडण झाले. तेव्हा वर्षा या जान्हवीला कळसूत्री बाहुली असे बोलताना पाहायला मिळाले. ते ऐकून जान्हवी आणखी चिडते ती वर्षा यांना धमकी देते, ‘ताई तुम्ही माझ्या नादी लागू नका. मी तुमचा आदर ठेवून बोलते. माझ तोंड खोलू नका, माझ्या नादी लागू नको.’ यावर वर्षा या लगेच कालचा एक विषय काढताना बघायला मिळाले. जान्हवीला तिचा राग अनावर होतो. ती इथेच थांबत नाही. ती वाटेल वर्षा यांना बोलताना दिसत आहे.

जेनिलियानंतर Ritesh Deshmukh चं ही ओटीटीवर पदार्पण; ट्रेलरने वाढवली उत्सुकता

रितेश भाऊ घेणार सगळ्यांची शाळा

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा दुसरा भाऊचा धक्का देखील धमाल राहणार आहे. आठवडाभर काही सदस्य निर्णय घेण्यात चुकले, तर काही विनाकारण भांडले, काहींनी संधी मिळालेले डाव सोडले. आता वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर आपला रितेश भाऊ या सर्व गोष्टींवर हल्लाबोल करताना पाहायला मिळणार आहे

follow us