BB Marathi: ‘माझ्या डोक्यात गेलं, तर मी त्याला…’; ‘बिग बॉस मराठी’च्या खेळाचा ‘असा’ आहे जान्हवीचा फंडा

BB Marathi: ‘माझ्या डोक्यात गेलं, तर मी त्याला…’; ‘बिग बॉस मराठी’च्या खेळाचा ‘असा’ आहे जान्हवीचा फंडा

Bigg Boss Marathi Day 13 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या (Bigg Boss Marathi ) सीझनला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली असून यावेळी वेगवेगळ्या सदस्यांची घरात एन्ट्री झाली आहे. (Bigg Boss Marathi Day 13) छोट्या पडद्यावरील खलनायिका म्हणजेच अभिनेत्री जान्हवीने (Janhvi Killekar) ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रवेश केला आहे. जान्हवीच्या येण्याने घरात रोजचा ड्रामा पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


जान्हवीने ‘बिग बॉस मराठी’मध्ये (Bigg Boss Marathi Day 13) जाण्याबद्दल तिच्या घरच्यांना सांगितलं तेव्हा त्यांना शॉक बसला होता. घरातील कामांबद्दल ‘बिग बॉस मराठी’च्या घरात जाण्याआधी जान्हवी म्हणालेली, मला कोणतीच कामं करायला आवडत नाही. मी माझ्या घरीही काम करत नाही. पण आता करावं लागेल. माझ्या जाण्याने गोंधळ होणार आहे. पण सगळ्यांचं मनोरंजन नक्कीच करेल.

जान्हवीने पुढे म्हणालेली, “मी घरात कसलीही प्लॅनिंग करून चालले नाही. कारण आपण करतो एक आणि वास्तवात होतं एक. म्हणून मी काही तयारी केली नाही. मी अतिशय शांत डोक्याने जात आहे. घरातल्यांसोबत मी अगदी छानपणे राहीन. कारण मी खूप गुणी आहे. पण जर कोणी माझ्या डोक्यात गेले तर मी त्याला सोडणार नाही. घरात फोन नसणार हे समजल्यावर मला थोडे आश्चर्यच वाटले. मी कायम फोनवर असते. आता या सगळ्यापासून एका वेगळ्याच जगात जायचे आहे जिथे वेगवेगळ्या स्वभावाची माणसे भेटणार आहेत. त्यांना कसे डील करायचे ते समजणे कठीण आहे पण प्रवास मजेदार होईल.”

Bigg Boss Marathi: तोंडाला तोंड लागतंय, धनंजय आणि छोट्या पुढारीमध्ये पडली वादाची ठिणगी

धनंजय आणि छोट्या पुढारीमध्ये पडली वादाची ठिणगी 

बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi ) घरातील सदस्य कधी एकमेकांसोबत चांगले असतील आणि कधी त्यांच्यात वाद निर्माण होईल हे सांगू शकत नाही. आजच्या भागातही छोटा पुढारी घन:श्याम दरवडे आणि धनंजय पवारमध्ये शाब्दिक चकमक झालेली पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये धनंजय पुढारीला विचारतोय,”पुढारी तुमच्याकडे किती कामं आहेत?”. त्यावर पुढारी एक असं उत्तर देतो. त्यावर धनंजय म्हणतो,”तोंड शिवलं होतं का आता विचारताना”. त्यानंतर छोटा पुढारी घन:श्यामला म्हणतो,”तोंड शिवलं का ही कोणती पद्धत आहे बोलायची”. त्यावर धनंजय म्हणतो,”मला वाटेल ते मी बोलेल”.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube